Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव ग्रामपंचायतच्या वतीने  मास्क सॅनिटायझर चे वाटप  

केळगाव ग्रामपंचायतच्या वतीने  मास्क सॅनिटायझर चे वाटप  


सरपंच शकील पांढरे अहवान
गावातील आशा ताई,मदतनीस अंगणवाडी सेविका यांना सहकार्य करावे.व अँटी कोरूना फोर्स माध्यमातून गावात चांगले काम चालू आहे .गावकर्यांच्या मदतीनेच सर्व सुरक्षा संभव आहे
त्यामुळे गावकारांनी नियम तोडू नका .


केळगाव:(प्रतिनिधी:वाशिम मुजावर) कोविड-१९ महामारी ने संपूर्ण जगात लॉकडाऊन पडले आहे.त्यासाठी त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सोसियल डिस्टनसिंग पाळले जात आहे. त्याप्रमाणे निलंगा तालुक्यातील  केळगाव येथे  कोरोणा संबंधित काळजी घेणे, विनाआवश्यक घराबाहेर पडू नये, अतिमहत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सामाजिक अंतर ठेवावे, बाहेर गावातुन आलेल्या लोकांची यादी बनविणे ईत्यादी प्रकारचे कामे  कोरोना फोर्स टीम व करत आहे तसेच  ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत  कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशाताई ,तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन हे कसोशीने प्रयत्न करत आहेत . अतिशय चांगले काम करत आहे तेंव्हा हे काम करणार्‍या उपरोक्त कर्मचाऱ्यांना स्वत: काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत त्यासाठी त्या सर्व कर्मचाऱ्यांना आशा ,मदतनीस, कोरोना फोर्स टीम व गावातील काही नागरिकांना  कोरोणा पासुनचे संरक्षण कीट साहित्य चे वाटप करण्यात आले त्यात मास्क , सॅनिटायझर,मास्क,ग्लोज, हे साहित्य देण्यात त्यावेळी वाटप करताना सरपंच शकील पांढरे, उपसरपंच बाबुराव राठोड, माजी सरपंच समद पांढरे, ग्रामसेवक, चेअरमन शिवाजी चव्हाण,उपचेअरमन एकनाथ काळे, तंटा मुक्ती चे अध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष दत्ता काळे,ग्रामपंचायत लिपिक अहेमद शेख, शौकत पठाण, शिवाजी राठोड, रावण कांबळे, शत्रुघन काळे,पदमाकर पेठकर, रामेश्वर काळे, आदी जण उपस्थित होते कोरोणापासुन संरक्षण करिता कीट वाटप करताना दोन व्यक्तीं मध्ये सामाजीक अंतर ठेवण्याचे नियोजन करण्यात आले .शेवटी सरपंच शकील पांढरे यांनी कर्मचार्‍यांच्या कामाचे शब्दांनी स्वागत करत शासन आदेशाप्रमाणे आपण काम करत राहावे आणि हे करताना  आपण स्वत:ची ही काळजी घ्यावी असे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments