Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा प्रवेश बंदी कायद्याचे उल्लंघन;एकावर गुन्हा दाखल

जिल्हा प्रवेश बंदी कायद्याचे उल्लंघन;एकावर गुन्हा दाखल



निटूर:(प्रतिनिधी:कुशाबा कांबळे) लॉकडाऊन चा नियम तोडून पुणे येथून आडमार्गाने प्रवासी घेऊन येण्याऱ्या निटूर येथील शिवशंकर भरत उकळे यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करू जाऊ ता.निलंगा येथील वस्तीगृहात कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सीमा बंद असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याचे माहीत असताना देखील जिल्हा प्रवेश बंदी कायद्याचे उल्लंघन केले व चोरट्या मार्गाने जिल्हा प्रवेशाची परवानगी न घेता स्वतः तीन प्रवासी पुणे येथून घेऊन चोरट्या मार्गाने औसा तालुक्यातील दावातपुर येथे सोडून निटूर येथे आले असता, अशी माहिती मिळताचं येथील ग्रामसेवक शाहूराज मिरकलकर यांनी शिवशंकर भरत उकळे रा. निटुर ता. निलंगा यांच्या विरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कलम 188,269,270,271 आय.पी.सी.सह कलम 2, 3, 4 साथरोग प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सरपंच  परमेश्वर  हासबे यांनी  सोशल मीडियाद्वारे यापुढे बाहेरून कोणीही आले तर त्यांना लगेच कॉरन्टाईन करण्यात येईल गावात कुणाला ही बोलवू घेऊ नका कुणाची ही गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments