Latest News

6/recent/ticker-posts

नळेगांव येथे शंभर गरजू कुटुंबाला अन्नधान्य वाटप

नळेगांव येथे शंभर गरजू कुटुंबाला अन्नधान्य वाटप


नळेगाव:(प्रतिनिधी) कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची मुदत ३ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. दरम्यान गरजूंना मदत म्हणून अन्नधान्य व रोजच्या गरजा(Deli Nids-किट) मदत म्हणून येथेल माजी ग्राम पंचायत सदस्य खूदबोदीन घोरवाडे यांचे कडून गरजू लोकाना १०० कुटूंबाना अन्न धान्य वाटप त्याच्या निवासस्थानी करणयात आले.सध्या कोरोनाने थैमान माजलेला आहे यात लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यात रोज मोलमजुरी करून आपले संसार चालवतात त्यांची या काळात अडचण निर्माण झाली आहे.त्यांना संकटाच्या काळात सहकार्यच्या भावनेने कोणीही उपाशी नसावे आपणच आपल्या बांधवांचे सरंक्षण करणे ही काळाची गरज आहे असे इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना खूदबोदीन घोरवाडे प्रतिक्रिया दिली.यावेळी तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, ग्रामसेवक रोकडे,अनिल चव्हाण, अमजद घोरवाडे,जफर घोरवडे, उस्मान सय्यद, शिवाजी बरचे, दयानंद सूर्यवंशी, अशोक बिराजदार,आकेफ घोरवाडे,रुमान तांबोळी,तौसिफ सय्यद,फैसल कोतवाल,इम्रान शेख आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments