Latest News

6/recent/ticker-posts

एकल महिला व मजुरानी केली तहसिलदाराकडे उपासमार थांबवण्याची मागणी

एकल महिला व मजुरानी केली तहसिलदाराकडे उपासमार थांबवण्याची मागणी


श्रमिक क्रांती  आभियानाच्या माध्यमातुन एकशे वीस आर्ज दाखल


देवणी:(प्रतिनिधी:विक्रम गायकवाड) कोरोना महामारीच्या बंद काळात एकल महिला व मजुरांचे प्रचंड हाल होत आसुन हातचे काम बंद आसल्याने यांची उपासमार होत आहे,केवळ तांदुळ  दिल्याने पोटाची भुक भागत नाही तर त्यासाठी भाजी पाला,मीठ,मिरची,कांदा, लहसुन या सुध्दा गोष्टी आति आवश्यक आसुन यासाठी सरकारने दररोज १००/- रु.प्रमाणे माहे रक्कम ३०००/- रुपयेची मदत एकल महिला व मजुराच्या खातेवर जमा करावी आशी विनंती एकल महिला व मजुरानी आपल्या आर्जात नमुद केले आहे,नळगीर गावच्या एकशे वीस महिला व मजुरानी श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र व महाराष्ट्र दलित हक्क समिती संघटनेच्या माध्यमातुन दि२१/०४/२०२० रोजी तहसिलदाराकडे आर्ज दाखल केले आहेत एकल महिलांना संजय गांधी निराधाराचे पेन्शन रुपये देत आहोत आसे सरकार सांगत आसले तरीही ही रक्कम आपुरी आहे आसे ही त्यानी आर्जात नमुद केले आहे,तसेच या महाभयंकर कठीण प्रसंगात एकल महिलांच्या कुटुंबियांला जगविण्यासाठी कुठलीही विशेष सुविधा सरकारकडुन निर्माण करण्यात आली नाही आशी खंत ही एकल महिलांनी व्यक्त केली आसुन आती गरीब व गरजु म्हणुन त्यांना विशेष सुविधा देऊन त्यांचे कुटुबं जगविण्याचा प्रयत्न चालवावा आशी मागणी ही एकल महिलाच्या आर्जात नमुद करण्यात आली आहे, तसेच मनरेगा मजुराच्या खातेवर रक्कम जमा करणेची घोषणा करण्यात आली आसुन ते ही मदत मजुराना देण्यात आली नाही,ते ही मदत तत्काळ देण्यात यावे, आणि काही महिलांच्या जनधन खातेवर ५००/- रुपये प्रमाणे रक्कम पडली आसुन बर्याच महिलांच्या बँक खातेवर रक्कम जमा करण्यात आली नाही म्हणून त्या नुसतेच बँकाना खेटे मारुन बेजार होत आहेत ते ही रक्कम तत्काळ आदा करण्यात यावी आशी ही मागणी या एकल महिला व मजुरानी केली आहे,या एकल महिला व मजुराचे आर्ज तहसिलदार उदगीर यांना प्रत्यक्ष भेटुन दाखल करुन त्यांची बाजु मांडण्याचे कार्य संघटनेचे मारुती गुंडीले, लक्ष्मण रणदिवे,राजकुमार सुर्यवंशी,बालाजी आदावळे,गोविंद शिंदे,प्रकाश गोरीले इत्यादी ने केले आहे.


Post a Comment

0 Comments