वैद्यकीय शिक्षण विभागाचे काम उत्तम, लातूर कोविड-१९ मुक्तचे कौतुक
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी मल्लीकार्जून खर्गे यांच्याकडून
महाराष्ट्रातील कोविड-१९ मुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा
लातूर:(प्रतिनिधी) कोविड-१९ आणि लॉकडाऊनच्या पाश्वभुमिवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे यांनी बुधवार दि २२ एप्रिल रोजी व्हिडीओकॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, मंत्री यांच्याशी संपर्क सांधुन राज्यातील एकुण परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यसरकार तसेच काँग्रेस पक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव, लातूर येथुन त्यांच्या खात्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लातूर जिल्हा कोविड-१९ मुक्त राखल्या बददल मल्लीकार्जून खर्गे यांनी त्यांचे व यासाठी कार्यरत सर्व यंत्रणाचे कौतुक केले.कोविड-१९ मुळे संपूर्ण जगात आणीबाणीची परिस्थिती असून भारतात आणि महाराष्ट्रातही या साथीला रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे यांनी बुधवारी महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नेते, मंत्री यांच्याशी व्हिडीओकॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क सांधून राज्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केद्रिंय मंत्री सुशिलकुमार शिंदे, महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार बाळू धानोरकर खासदार कुमार केतकर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अदिवाशी विकासमंत्री के.सी. पाडवी, इतर मागासवर्ग व भुकंप पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, वस्त्रोदयोग मंत्री असलम शेख, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री. विश्वजित कदम, माजी प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री एकनाथ गायकवाड, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, अमीन पटेल, उल्हास पाटील, रजनी पाटील, सचिन सावंत, मोहन जोशी, बी.एम. संदीप, आशिष दुवा, सोनल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव चल्ला वाशिम चांद रेड्डी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपत कुमार आदी मान्यवरांशी संवाद सांधला.राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या व्हिडीओकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड-१९ ला रोखण्यासाठी आपल्या खात्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शिवाय लातूर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून हा जिल्हा अदयाप कोविड-१९ मुक्त असल्याचे सांगितले.या व्हिडीओकॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी असलेल्या सर्वच नेत्यांनी या कामाचे कौतुक केले.
0 Comments