Latest News

6/recent/ticker-posts

आ.अभिमन्यु पवार यांची तहसील कार्यालय व पंचायत समितीला भेट 

आ.अभिमन्यु पवार यांची तहसील कार्यालय व पंचायत समितीला भेट


औसा:(प्रतिनिधी:सय्यद नदीम) आ.अभिमन्यु पवार यांची आज औसा येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे भेटी देऊन मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाई व करावयाच्या उपाययोजना, मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना गावपातळीवर रोजगार देण्यासाठी करावयाचे नियोजन व हाती घ्यावयाची कामे अतिवृष्टी नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणे, दिव्यांगांना १४ व्या वित्त आयोगातून प्रलंबित निधी वितरित करणे, अन्नधान्य वितरण आदी कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या.यावेळी औसा च्या तहसीलदार सौ.शोभा पुजारी, गटविकास अधिकारी भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी आर.आर. शेख व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारीवरून कान्हेरी, वाघोली व दापेगाव येथील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन अन्नधान्य वितरणाचा आढावाही घेतला.


Post a Comment

0 Comments