शिववंश प्रतिष्ठाण कडुन घेण्यात आलेल्या आँनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर
कोरोनाच्या वाढत्या पाशर्वभुमिवर जनजागृती साठी राबवण्यात आला उपक्रम
पुणे: (शहर प्रतिनिधी: तानाजी मोहोळकर) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतवर्ष लाँकडाऊन आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाज व्यवहार ठप्प आहेत. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग सर्व काही बंद आहे. कोरोनाचे संकट परतवुन लावण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करतंय जनजागृती साठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनाही पुढाकार घेत आहेत.
समाजामध्ये विशेषतः तरुण वर्गाने या जनजागृतीच्या कार्यात स्वतःला झोकुन द्यावं या उद्देशाने शिववंश प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सचिन नरवडे यांच्या संकल्पेतुन आँनलाईन निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. महाराष्ट्रातील ३५ वयोगटाच्या आतला कुठलाही स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकत होता. भारतीय संस्कृती आणि वास्तविकता, या जन्मावर शतदा प्रेम करावे, आजच्या युवकांपुढील आव्हाने, कोरोनाच्या पाशर्वभुमिवरील केंद्र सरकारची धोरणे असे विषय या स्पर्धेमध्ये हाताळले गेले.महाराष्ट्र भरातुन उदंड असा प्रतिसाद या आँनलाईन निबंध लेखन स्पर्धेला मिळाला. प्रतिक्षा अशोक गुंजाळ (शेवगाव, अहमदनगर), हर्षदा प्रताप शिंगोटे (मुंबई),नंदकुमार तुळशीराम वाघ (खराडी, पुणे) या स्पर्धकांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.कोरोनाचे संकट टळल्यावर आ.चेतनदादा तुपे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान होईल. शिववंश प्रतिष्ठाणचे संस्थापक नितीनदादा टकले, समाजसेविका निकीताताई टकले, राजकुमार भंडारी,विशाल तुपे यांच्याकडुन विजेत्यांना बक्षीस मिळेल.
या निबंध स्पर्धेसाठी नितीन पटेल, दादासाहेब येवले यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले. शिववंश प्रतिष्ठाणचे संस्थापक नितीनदादा टकले यांच्या मार्गदर्शनाखाली शिववंश प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सचिन नरवडे यांच्या संकल्पेतुन ही अभिनव स्पर्धा पार पडली.
0 Comments