कित्येक वर्षे खाऊन चिखलात खस्ता, अखेर झाला रस्ता
बालाजी शिंदे यांची मध्यस्थी ठरली यशस्वी
{ बाबुराव आगलावे}
भादा: गेली कित्येक वर्षे भादा ते येल्लोरी रस्त्यावर मोजक्या ठिकाणी काट्या, कुपाटी आणी पावसाळ्यात गाळाची दलदल असायची परिणामी माणसाला रिकामही चलता येत नव्हते. हि समस्या पावसाळ्यात तर अधिकच वाढायची पण या भागातील शेतक-यांची हि अङचण लक्षात घेवुन या गावचे नेते बालाजी शिंदे यांनी हा रस्ता शेतक-यांना व्यवस्थित करूण दिला त्यामुळे शेतक-यांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भादा ते येल्लोरी रस्त्यावर वरवङा रस्त्या पासुन पुढे जाताना काही ठिकाणी सतत पावसाळ्यात चिखल व्हायचा त्यामुळे माणसाला पावसात रिकामही चालता यायचं नाही एवढेच नव्हे तर या ठिकाणाहुन शेतक-यांना आपला शेतीमालही घरला आणता येत नव्हता हि गेल्या कित्येक वर्षांपूर्वी पासुनची अङचण या भागातील शेतक-यांनी या गावचे नेते बालाजी शिंदे यांच्यापुढे मांङली त्यानंतर त्यांनी या रस्त्याच्या बाजुच्या शेतक-यांना चर्चा करून हा रस्ता शेतक-यांना करून दिला. त्यामुळे गेली कित्येक वर्षे पावसाळ्यातील होणा-या या त्रासा पासुन शेतक-यांची आता सुटका झाली असल्याने शेतक-यातुन आनंद व्यक्त होत आहे. याच कामात हातभार म्हणुन काही शेतक-यांनी मदतही केली तर अनेकांनी श्रमदानही केले. हा रस्ता होण्यासाठी या कामाचा सतत पाठपुरावा माजी ग्रा. पं. सदस्य खलील सय्यद यांनी केला व त्यांना त्यात यशही आले. यासाठी रियाज खोजे, आदम खोजे, समिर खोजे, जिंदावली खोजे, महेबुब तांबोळी, सलीम सावकार, भागवत बनसोङे, संजय बनसोङे, चंद्रभुषण गौर, आनंदा कोळी, बळीराम विभुते, या सह अनेकांनी मदत केली तर या रस्ता होण्यासाठी अत्यंत मोलाची मदत माजी सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केल्याची भावना खलील सय्यद यांनी व्यक्त केली .
0 Comments