चाकुर शहरातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याचे व्यापारी असोसिएशनचे अवाहन
तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना दिले निवेदन
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरांतील मुख्य बाजारपेठेतच होत असलेल्या दारु (मद्य) विक्रीच्या दुकानांस विरोध म्हणून मंगळवारी चाकुरातील बाजारपेठ बंद ठेवण्यांचे जाहीर अवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे.अशा अश्यांचे निवेदन चाकुर तहसिलमध्ये यांना देण्यात आले.
नगरपंचायत मिळकत क्रमांक [१३९३] यादुकांनामध्ये नवीन दारु विक्री व परमिटरुम दुकांनात सुरु होत असुन सदरील दुकान मुख्य बाजारपेठेत आहे.नगरपंचातीचा मोठा आठवडी बाजार यांचा मुख्य बाजारपेठेत भरतो.बाजारांत महिला,वयोवृध्द पुरुष,स्ञी,शेतकरी,शेतमजुर,भाजीपाले विक्रेता,छोटे व्यापारी,हातगाड्यावरील व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात येत असतात.या ठिकाणांपासुन जवळच मारोती मंदिर असुन अनेक भक्त मंडळी दिवसभर दर्शनांस येतात.यासर्व दृष्टीने दारु दुकान असुविधा ञासदायक होणारे अनेक समस्यांना तोड घ्यावे लागु शकते.
याठिकाणां पासुन जि.प.मुलांची व मुलीची शाळा असुन यांचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.अनेक सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,राजकीय कार्यक्रम व सभेचे मुख्य ठिकाण आहे.जर याठिकाणी दारु विक्री व परमिट रुम दुकान सुरु झाल्यास बाजारपेठेतील व्यापारी,ग्राहक,रहिवाशी, वयोवृद्ध , भाविक भक्त मंडळी यांना यादुकानाचा मोठा ञास होणार आहे.यांचा परिणाम म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल नशापान करणारी मंडळी रस्त्यावर असतील.त्यामुळे महिलांना असुरक्षितता होईल.शाळेत जाणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होईल.सर्वच चाकुरकर या दारु दुकानांचा विरोध करीत असुन शहरात येणारे दुकान चालु करु नये अशी मागणी केली आहे.आंदोलनांचा दुसरा टप्पा म्हणून आज सर्वच व्यापारी मंडळीने आपले व्यवहार व दुकान बंद ठेवण्याचे अवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष,चाकुर न.प.उपध्याक्ष नितीन रेड्डी,नगराध्यक्ष सौ.रुपाली पवार, बालाजी सुर्यवंशी,प्रभाकर करंजकर,अभिमन्यु धोंडगे,चिटबोने अतीष,गोलावार दिलीप,हाळे महादेव,शेटे महादेव,गजानन करेवाड,नारायण बेजगमवार,अजय धनेश्वर,सचिन व्होट्टे,आदीने केले आहे.
0 Comments