राज्यात उच्च शिक्षित बेरोजगार करणार शिक्षकदिनी भक्षक दिन साजरा; राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन
सोलापूर:(प्रतिनिधी) येत्या ५ सप्टेंबर २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्रताधारक बेरोजगार युवक-युवती आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि यापूर्वी शासनदरबारी वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणत्याही स्वरूपाची सकारात्मक कार्यवाही केली गेली नसल्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार शासनाच्या निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक "डिग्री जलाओ आंदोलन" करून "शिक्षक दिन हा भक्षक दिन" म्हणून साजरा करणार आहेत या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखेतील (कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, सामाजिक शास्त्र, कायदा शास्त्र) पदविका, पदवी, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड., बी.पी.एड, एम.एड., एम.पी.एड., एम.फिल.,नेट, सेट आणि पीएचडी पात्रता धारक बेरोजगार यांच्या सर्व संघटना आणि अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (कनिष्ठ व वरिष्ठ), महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तासिका, कंत्राटी, Ad-hoc, अतिथी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या आणि अश्या जवळ जवळ ३० - ३२ संघटना मिळून हि कृती संपुर्ण महाराष्ट्रात शांततेत (मुकपणे), कोव्हिड-१९ महामारी संदर्भातील शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व आदेशांचे पालन करून आंदोलन करणार असल्याचे प्रा.सिद्धार्थ तळभंडारे, प्रा. नितीन घोपे, प्रा.मनोज मुनीश्वर,प्रा. सुदाम राठोड,प्रा.विवेक कोरडे, प्रा.सुधीर मुनीश्वर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments