कुणाचा पांडुरंग हरवला...
कुणाचा गंगाधर गेला...
मुर्दांड यंत्रणेचा बळी गेलेले या दोघासारखे अनेक पत्रकार या व्यवस्थेचे बळी गेले आहेत..राब राब राबायच..दिवसरात्र बातम्यांच्या पाठीमागे पळायचं,आपलं स्वतःचं अस काही पहायचं नाही...एसीमध्ये बसून दणादण assignment द्यायच्या..घोडे नाचवल्यासारखे पत्रकारांना नाचवायच..त्याच्या न पगाराची चिंता न त्याच्या आरोग्याची काळजी.एखादी बातमी चुकली की पुन्हा त्याची होणारी हेटाळणी वेगळीच..नको त्या प्रलोभनाच्या पाठीमागे पळत राहायचं..घर,संसार,लेकर, बाळ या सगळ्याकडे दुर्लक्ष करत फक्त आणि फक्त संस्थेचा विचार करायचा..आज काय मिळाले?एक बेडसाठी रात्रभर हेळसांड,एका ऑक्सिजनच्या नळीसाठी पांडुरंग फिरत राहिला..इकडे गंगाधर यांनी तर लिहूनच ठेवले..काय करणार?आज आपण दोष देवून उपयोग काय?काही गोष्टी आपण आपल्या केल्या पाहिजेत असे मला वाटते.आपली काही हक्काची माणसे प्रत्येक क्षेत्रात असायला हवीत..त्याने हाक मारली की पळत यायला हवं..आपण एका मस्तीत जगतो,पत्रकाराची झुल अंगावर चढवली की आपल्याला आकाश ठेंगणे वाटायला लागते.आपण नको त्या अधिकाऱ्यांना,नको त्या ठिकाणी आपली पत्रकारिता पाजळत असतो.आमच्या मानगुटीवर बसलेलं पत्रकारितेचं भूत उतरायला तयारच नसतं..आपल्या कपाळावर काही पत्रकार असल्याची पाटी नसते,मात्र आपण बेमालूमपणे अनेकांना नाराज करतो,नको ते बोलतो आणि असंख्य शत्रू आपण तयार करून घेतो.पत्रकारांना,पोलिसांना घर देताना तीन तीनदा का विचार केला जातो?या प्रश्नाकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे..आम्ही आमच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत आमचे कुटुंब,पाहुणे,मित्र साधे सुरक्षित करू शकत नाही..कायम वाताहत असलेल्या कुटुंबाला टांगती तलवार घेवून जगावे लागते..मला वाटतं,पांडुरंग इतका मोठा पत्रकार होता तर त्याने काही हक्काची माणसे का जमवली नाहीत?एखादा आपला फॅमिली डॉक्टर असतो,एखादा आपला मित्र असतो त्यांच्याकडे ही व्यथा का पोचवली नाही.जर आपण दवाखाण्यापर्यंत पोहचूच शकलो नाही तर दोष कुणाचा?मृत्यूचे तांडव सुरू आहे,ज्या TV ९ मध्ये तो काम करत होता,त्यांच्यापैकी एकालाही का वाटले नाही की,पांडुरंगला एखादे भव्य हॉस्पिटल उघडून द्यावे..पाहिले दोषी त्याची संस्था आहे,त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना का वाटले नाही,आपला कर्मचारी इतका विव्हळत सुटला आहे,त्याच्यासाठी एखाद्या हॉस्पिटलचे दार उघडे करावे..जर त्या टीव्हीचा मालक आजारी असता तर त्याने काय,ऑक्सिजन शोधत फिरले असते काय?सर्व पत्रकारांनी या घटनेचा अभ्यास करायला हवा..पत्रकार संघटनांनी विम्याच्या संरक्षणाची हमी घ्यायला हवी..नुसत्या मिरवणाऱ्या संघटना नकोच..त्यापेक्षा ठोस काही करता आले तर पाहावे..
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या हक्काची माणसे,मित्र,संस्था तयार करायला हव्यात..तुमच्याबद्दल विश्वास वाटेल असे वातावरण तयार करायला हवे..तुमचा एक तरी हक्काचा मित्र तयार करा..जो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी पाहिजे ते उपलब्ध करून देईल..तुमचा विश्वास वाटेल असे वातावरण तयार करा..पत्रकारिता होईल,जाईल..प्रश्नांना वाचा फोडाल,काही प्रश्न राहतील..तुमचा जीव आणि कुटुंब महत्त्वाचे आहे याचे भान ठेवा..आपला पांडुरंग होवू द्यायचा नसेल तर..एक तो हक बनता है...
संजय जेवरीकर{ज्येष्ठ पत्रकार} लातूर
0 Comments