Latest News

6/recent/ticker-posts

लातूर पोलिसांना यश;अपहरण झालेला रियांश सुखरूप

लातूर पोलिसांना यश;अपहरण झालेला रियांश सुखरूप



लातूर:(प्रतिनिधी) दि. ११ सप्टेबर रोजी सायंकाळी सांगवी ता. रेणापूर येथिल घरासमोर खेळत असलेल्या रियांश निळकंठ सावंत(वय ५ वर्ष) याचे अपहरण झाले होते,तो लातूर पोलिसांचे अथक प्रयत्नानंतर सुखरूप सापडला अाहे.पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली चार चाकी ही जप्त केली अाहे.


    मुळचे सांगवी चे पण सद्या ठाणे येथे व्यवसायानिमित्त स्थाईक असलेले निळकंठ देविदास सावंत यांचा पाच वर्ष वयाचा मुलगा गावी अाजोबाकडे अाला होता, सदर मुलगा काल ११ सप्टेबर रोजी गावातील घरासमोर खेळत असताना काही अज्ञातांनी चार चाकी गाडीतून रियांश चे अपहरण केले.हा गुन्हा घडताच पोलिस अधिक्षक डाॅ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव, अधिकारी , कर्मचारी यांनी अत्यंत सावधपणे अपहरण झालेल्या रियांश ची सुखरूप सुटका करण्याचे अव्हान स्विकारले. त्या बाळाला लातूर तालुक्यातील चाटा गावच्या शेजारी सोडून अपहरण करते फरार झाले त्यामुळे हा मुलगा चाटा गावात जाऊन पोहचला आणि गावकऱ्यांनी पोलीस ठाणे मुरुड यांना कळवले व पोलीस प्रशासन वेळीच पोहचून त्या बाळाला ताब्यात घेऊन नातेवाईकाचे ताब्यात दिले. चोरट्यानी या गुन्हासाठी वापरलेली चार चाकी बीड जिल्हातून मिळविली. अपहरणकर्ते कोण होते याचा तपास पोलिस घेत अाहेत.रियांशचे अपहरण होताच लातूर पोलिसांनी काही तासातच सुखरूपणे पालकाचे ताब्यात दिले याबद्दल पोलिसांचे सर्वञ अभिनंदन होत अाहे.


Post a Comment

0 Comments