मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आऱक्षणाचेही अध्यादेश काडावे- मोहसीन खान
लातुर:{प्रतिनिधी} देशात आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मुस्लिम समाज हा इमान-ए-इतबारे सोबत राहिला परंतु मुस्लिमांच्या मतांचं राजकारण झालं,गेल्या अनेक वार्षांपासून मुस्लिम समाज हा अधोगतीचं जीवन जगत आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याबाबतीत बोलले जाते परंतु सुरुवात कोणी करत नाही या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण,आरक्षण आणि संरक्षण असणे गरजेचे आहे. २०१४ च्या निवडणुकी दरम्यान मराठा समाजाला १८% आणि मुस्लिम समाजाला ५% आरक्षण देण्यात आले होते . परंतु फडणवीस शासनाने मराठा आरक्षण देऊ केले परंतु मुस्लिम समाजाला दिलेले ५% आरक्षण नाकारून कोर्टाने दिलेले शैक्षणिक आरक्षण हि काडून घेतेले,आज मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यामुळे मराठा आरक्षण परत कोड्यात पडले आहे यावर शरद पवार,अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचे नवीन अध्यादेश काढण्याने सूचित केले आहे परंतु मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल; 'ब्र ' हि काढला नाही . गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिला मुस्लिम मतांवर सत्ता भोगली,राज्य केले आणि आज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत कोणालाच काही कसे वाटत नाही ! मराठा बांधवांनी आरक्षणासाठी खूप मोठी चळवळ चालवली आणि आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा त्यांना घ्यावा लागत आहे,त्यांच्या या मागणीला मुस्लिम समाज हा खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मराठा आरक्षणासोबत मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचेही अध्यादेश शासनाने काढावे आणि मुस्लिम मराठा आरक्षणासोबत मुस्लिम आरक्षणालाही दुजोरा द्यावा अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस मोहसीन खान यांनी केले आहे .
0 Comments