Latest News

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणाचा शासनाने त्वरित अध्यादेश काढावा

मराठा आरक्षणाचा शासनाने त्वरित अध्यादेश काढावा



आमदार बाबासाहेब पाटील यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना निवेदन


 चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) मराठा आरक्षणस मिळालेल्या स्थगितीस योग्य मार्ग काढून त्वरित अध्यादेश काढावा अशा प्रकारचे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे.


     आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात दि.९ सप्टेंबर रोजी सर्वोच न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे.त्या निर्णयाचा मी सन्मान करतो परंतु स्थगिती दिल्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष२०२०-२१ मध्ये मेडीकल ,उच्च शिक्षण व ईतर शालेय शिक्षणाकरिता मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यापुर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश व नौकर भरती संदर्भातील आरक्षण जैसेते ठेवून सरकारने विशेष वटहुकुम काढून मराठा समाजीतील विद्यार्थ्यांवरचा अन्याय दुर करावा.असे नाही केले तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थी शिक्षण व नौकरी पासून वंचित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणा बाबत त्वरित अद्यादेश काढून यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments