Latest News

6/recent/ticker-posts

न्यायालयीन कामकाज पुर्ण क्षमतेने पुर्वीप्रमाणे चालु करावे; चाकुर बार असोसिएशनची मागणी 

न्यायालयीन कामकाज पुर्ण क्षमतेने पुर्वीप्रमाणे चालु करावे; चाकुर बार असोसिएशनची मागणी 



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर बार असोसिएशनच्या वतीने चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.२२ मार्च पासुन आजतागायत कोविड-१९ या संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देशातील न्यायलयीन कामकाज बंद असुन त्यामुळे सर्व विधीज्ञांचे व त्यांच्यावर निर्भर असलेल्या कुटुंबांचे आर्थिक बेहाल होत आहे.देशातील न्यायलयीन कामकाज सोडले इतर संपूर्ण शासकीय निमशासकीय कार्यालय नियमांच्या अधीन राहुन चालु आहेत.केवळ न्यायलयीन कामकाज बंद असल्यामुळे विधीज्ञांना इतर कोणतेही कामकाज करता येत नसल्यामुळे विधीज्ञ व त्यांचे कुटुंबिय हलाखिचे जीवन जगत आहेत. बर्याचशा विधीज्ञांनी शासनाच्या नाकर्तेपनामुळे विधीज्ञ कुठल्याही आर्थिक मदतीची तरतुद शासनाने अथवा न्यायालयीन व्यवस्थेन केली.नसल्यामुळे आर्थिक ञासांला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.शासनाने कोविड-१९ संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावात विधीज्ञांना कोणताही सुरक्षा विमा कवच प्रदान केलेला नाही.संपूर्ण देशातील विधीज्ञांना ५० लाख रुपयेचा सुरक्षा विमा कवच लागु करावे.नियमांवली ठरवुन कोविड-१९ संसर्गजन्य आजारांच्या काळामध्ये पुर्ण क्षमतेने कामकाज चालु करावे.जोपर्यंत पुर्ण क्षमतेने न्यायालयीन कामकाज चालु होत नाही,तोपर्यंत मार्च २०२० ते चालुकाळापर्यत १५०००/रुपये सर्व विधीज्ञांस शासनामार्फत किंवा बार कौन्सिल अॉफ महाराष्ट्र गोवा यांच्या मार्फत मानधन देण्याबाबत उच्च व सर्वाच्च न्यायालयाने आदेश पारीत करावे.विविध मागण्या लवकरात लवकर मान्य नझाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. निवेदनांवर अध्यक्ष अॕन्ड, एस.जि.जवादे, सचिव अॕन्ड. एस.व्ही.गंभीरे, सुनिल व्ही.फड,मोहन एस.शिंदे,डी.जे.कापसे,डी.एम.पाटील,डी.पी.महालिंगे,के.एम,कर्डिले,विधीज्ञांच्या स्वाक्षरी आहेत.


Post a Comment

0 Comments