Latest News

6/recent/ticker-posts

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ मागणीच्या अनुषंगाने व्यापक बैठक

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ मागणीच्या अनुषंगाने व्यापक बैठक



लातुर:( प्रतिनिधी) दि.१० - विद्यार्थी, पालक,कर्मचारी, प्राध्यापक, कर्मचारी आदीची गैरसोय दूर व्हावी यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून लातुर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र पेठ लातुर येथे सुरू करण्यात आले आहे. आज विद्यार्थ्याची संख्या, महाविद्यालयाची संख्या,विद्यार्थ्यांनच्या संशोधन वृत्तीला प्रेरणा मिळावी म्हणून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी २०१४ पूर्वी पासून शासकीय व प्रशासकीय स्तरांवर लाऊन धरत तत्कालीन मुख्यमंत्री,राज्यपाल,शिक्षणमंत्री आदींना प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने,स्वाक्षरी अभियान, धरणे आदींच्या माध्यमातून विषय लावुन धरला आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री मा ना अमित विलासराव देशमुख यांना कृती समितीचे वतीने दि.०८ मार्च २०२० रोजी शिस्ट मंडळाद्वारे भेटून मागणी करण्यात आली होती तात्काळ अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना दि.०९ मार्च २०२० रोजीच्या पत्रांनव्ये आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती, लातुर यांनी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांच्या मागणीनुसार शैक्षणिक व अन्य क्षेत्रात लातुर पॅटर्न प्रचलित आहे. परंतु सध्या लातुर येथे अस्तित्वात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्यामुळे स्थानिक स्तरांवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करणे बाबत कळलेले आहे(पत्र सोबत जोडले आहे)


मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून आजतागायत कोरोनाच्या स्तिथीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत वाढती रुग्णाची संख्या, मृत्यूची संख्या आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या पाठपुराव्यास संथ गती आली होती स्वतंत्र विद्यापीठाच्या अनुषंगाने व्यापक बैठक घेण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यास विद्यार्थी, पालक,संस्थाचालक, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षण तज्ञ,शिक्षेत्तर कर्मचारी,शिक्षणप्रेमी ,सामाजिक संघटना,समस्त लातुरकरानची व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती मुख्यसंयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे,धनराज जोशी, प्रा एकनाथ पाटील, बालाजी पिंपळे,अड गोपाळ बुरबुरे,ताहेरभाई सौदागर,प्रा संगमेश्वर पांनगावे,अड अजय कलशेट्टी,प्रा भीमराव डुनगावे,रणधीर सुरवसे, जावेद मणियार, प्रा गिरीधर तेलंगे,प्रा दत्तात्रय खरटमोल, सुनील खडबडे,प्रा योगेश शर्मा, अड अजित चिखलीकर, साईनाथ घोणे, सातलींग गौड, दिगंबर कांबळे,मुन्ना तळेकर,योगेश शिंदे,अनतेश्वर कुदरपाके,डॉ अंबादास कारेपूरकर, यशपाल कांबळे,डॉ विनोद घार,चैतन्य फिस्के,जमालोद्दीन मणियार,फिरोज तांबोळी यांनी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments