सोयाबीनच्या ऊभ्या पिकालाच फुटले मोड;औसा तालुक्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी.जी.शेख)दि.१७ - तालुक्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे पिके चांगली बहरली होती. मात्र ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसात पेरणी केली होती,त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाला पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने उभ्या असलेल्या पिकालाच मोड फुटत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
मध्यंतराच्या काळात पावसाची कमतरता होती असे वाटत होते की हातातोंडाशी आलेला घास पावसाअभावी निघून जातो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.निसर्गाच्या कृपेमुळे पाऊस व्यवस्थित झाला.पिके चांगली बहरली होती.अशावेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाच्या सरी कमी न झाल्यामुळे ऊभ्या पिकालाच मोड फुटत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. या आधी शेतकऱ्यांचा मुग कवडीमोल भावाने विकला गेला. यासाठी केलेला खर्च निघाला नाही. शेतकऱ्यांची सर्व आशा सोयाबीनवर होती. कुटुंबाचा खर्च कसा भगवावा या विवंचनेत शेतकरी जगत आहे.
अशा पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून केली जात आहे.
0 Comments