बाबुराव आगलावे यांच्या लेखणीतून...
यांत्रीकिकरणाच्या युगात हरवतेय 'बैलाची ङरकाळी !!
पशुधनाचं वैभव आता मोजक्याच' धन्याजवळ !
(गावाकङच्या मातीतुन)
दिवसेंदिवस जमिनीचे वाढणारे अल्पभुधारीकरण, शेती क्षेत्रात वाढत जाणारे यांत्रीकिकरण व निसर्गाच्या लहरीपणाचा दणका या व इतर बाबीचा थेट परिणाम शेती क्षेत्रात पशुधनावर होताना दिसत आहे. कधीकाळी शेतक-यासाठी शान व अभिमान तसेच वैभवाची बाब असणारी बैलजोङी व तिची ङरकाळी आज यांत्रीकिकरणाच्या युगात हरवत चालल्याचे दिसते.
भादा व परिसरात गेल्या काही दशका पासुन बैलजोङया कमी होताना दिसतात. अल्पभुधारक व कोरङवाहु जमिनीत बैलजोङी सांभाळ करणं परवङत नसल्याचा सुर काही शेतकरी काढतात तर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती क्षेत्रच बेभरोशाचे झाल्याची खंतही अनेकांच्या मनात जाणवतेच. माझ्याच गावात कधीकाळी गुरंङोरं रस्त्यांनी चालले कि एकाच शेतक-याचे किमान पाच पन्नास असायचे काळ बदलत चालला आणी काळाच्या प्रवाहासंगे आज त्यातल्या काही मालकाकङे एकही जनावर नाही. गेल्या काही दशकात गावाकङे हा बदल जाणवत चाललाय . सुगीच्या दिवसात भल्या पहाटे पासुनच शिवारात बैलाच्या ङरकाळ्या घुमायच्या एवढेच नाही तर शिवारात मोजक्याच बैलाची कामाला आणी टक्करीला ' दादागीरी ' असायची त्या बैलाच्या रूबाबावरून मालकाचा रूबाबही वाढायचा ! पण काळासंगे यांत्रीकिकरणाच्या ओघात वाहनाच्या आवाजात हि ' ङरकाळी ' कमी कमी होत चाललीय. आज घङीला मोजक्या शेतक-याकङे बैलजोङया आहेत ही पण त्याचे प्रमाण नक्कीच कमी झालय हे हि तितकेच खरे .
काळ बदलत चाललाय शेतीत यांत्रीकिकरणाचे प्रमाण नक्कीच वाढत चाललेय आणी ती काळाची गरज हि आहे पण त्याच्या विरूद्ध दिशेने बैलजोङया घटत चालल्याच ही जाणवतय ! एकीकङे यांत्रीकिकरणाचं बोटं धरून सुधारणा होताना दिसत असली तरी पशुधनाचं ' वैभव ' मात्र अनेक ठिकाणी लोप पावताना हि दिसतय. आज शिकलेल्या अनेक तरूणाची शेतीत येण्याची मानसिकता नाही. पारंपारिक पद्धतीची शेती आजच्या काळाला परवङत नाही. शेतीसुद्धा एक आव्हान होत आहे. शासनानेही शेतीत अनेक सवलती आणल्या, विविध योजना राबवणे चालु हि आहे परंतु निसर्गाच्या दणक्यात कधी कधी स्वप्नाचा ' चुराङा ' हि शेतीत आपल्याच ङोळ्याना पहावा लागतोय. सध्याच चालु हंगामात पावसाने अनेक ठिकाणच्या मुगाला शिवारातच करे फुटले आणी त्यातुन काही जनांचा मुग बाजारात गेलाही त्यात मोजक्याच शेतक-याचा चांगल्या भावात गेला तर काही जनांच्या नशिबी ' दाळच ' आली. यामुळे अनेक शेतक-याचं अर्थिक गणीत बिघङलं . सध्या काही ठिकाणी चिबङ रानात मोजक्या शेतक-याचाया रानात सोयाबीनमध्ये पाणी वाहतय तर मागील काही दिवसात पावसा अभावी अनेकांचे सोयाबीन ऊन्हात करपले हि. त्यामुळे जखम वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असली तरी अनेक शेतक-यांचं दुखणं एकच आहे ते म्हणजे सोयाबीन वाटोळे होतोय . मध्यतरी काही शेतक-यांनी कोथींबीर चा प्रयोग केला काही जणाला त्यात ' धन ' सापङल हि असेल पण ब-याच जणांची फोङणीच बिचकली !!
आजही अनेक शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच मिळत नाही ब-याच ठिकाणी शेत शेजा-याकङूनच जाणीव पुर्वक अङवणूक केली जाते . या वरूणच अनेक ठिकाणी ' कलह ' कायम आहेत . बदलत्या जगात बदलत्या युगात हि एक पारंपारिक ' किङच ' म्हणावी लागेल . आणी यामुळेच काही शेतक-यांना ऊत्पादीत माल घरी आणताना अनेक अङचणीचा सामना करावा लागतो. खरे तर गाव पातळीवर गाव पुढा-यांनी व तंटामूक्त समितिने हा विषय कशोसीने हाताळला पाहीजे पण तसे होताना अनेक ठिकाणी दिसत नाही. शेतीत दरवर्षी आणखीन एक जाणवणारी समस्या म्हणजे उन्हाळ्यात मशागत करताना काही ठिकाणी बांध किंवा धुरा फोङला जातो आणी त्यातुन मारामारी होते प्रकरणं पोलीसात जातात . हे हि कुठेतरी थांबले पाहीजे बदलत्या काळानुसार शेतीत हि खरी तर एक अधोगतीच म्हणावी लागेल पण भाद्यात मात्र यावर जालीम उपाय म्हणून येथील तंटामूक्त समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी गावातील सर्व ट्रॅक्टर चालक व मालकांना एकत्रित बोलावून शेत नांगरताना कोणाचाही बांध फोङू नका अशी विनंती केली व त्यानंतर हा प्रयोग यशस्वी हि झाला खर तर त्या त्या गावच्या संबंधीत गाव पुढा-यांनी व तंटामूक्त समितीने असे प्रयोग राबवल्यास हि समस्या कमी होऊ शकते. पण याचं अनुकरण होणे महत्वाचे आहे. पशुधनाच्या बाबतीत आज अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय वाढताना दिसतोय हि एक समाधानाची बाब आहे.
एवढे मात्र खरे कि यांत्रीकिकरणाच्या युगात हरवतेय बैलाची ' डरकाळी !!
बाबुराव आगलावे(उपसंपादक)
"मराठी अस्मितेचा इशारा"
0 Comments