एकमेकींना सहाय्य करा संघटन वाढवा,महिला कार्यकर्त्यांना कामाची भूक लागली पाहिजे- सविताताई कुलकर्णी
लातूर:(प्रतिनिधी) लातूर शहर महिला मोर्च्याची बैठक पार पडली. तसेच सर्व नवनियुक्त महिला पदाधिका-यांना सविता ताई कुलकर्णी लातूर शहर प्रभारी तथा सरचिटणीस महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. मातोश्री स्कूल, एलआयसी कॉलनी रिंग रोड भागात झालेल्या कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सौ सविता ताई कुलकर्णी, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, महिला मोर्च्याच्या शहर जिल्हाध्यक्षा मीनाताई भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये, सरचिटणीसपदी, शोभाताई कोंडेकर व रत्नमाला घोडके, उपाध्यक्षपदी अनघा अंदुरीकर, कल्पना वाघमारे, भाग्यश्री भोसले, चिटणीसपदी पूजा शेळके, कीर्ती स्वामी, रश्मी बेळंबे, कोषाध्यक्षपदी कल्पना कुलकर्णी, सदस्या म्हणून सीमा धर्माधिकारी, मनीषा रेणापूरकर, अनिता कुसनूरे, आयेशा पठाण, सुशीला पाटील, गोदावरी पांचाळ, ज्योती मंगलगे, सरिता भडीकर, चेतना जैन, मानसी कुलकर्णी, हेमा कनकदंडे, लक्ष्मी पुरी, राजश्री महिंद्रकर, अश्विनी दिवान, शोभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच सर्व मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडळ अध्यक्षा राधिका लोखंडे, महात्मा बसवेश्वर मंडळ अध्यक्षा शितल कुलकर्णी, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर मंडळ अध्यक्षा निर्मला कांबळे सिद्धेश्वर मंडळ अध्यक्षा सुनिता उबाळे स्वामी दयानंद मंडळ अध्यक्षा रंजना निलंगेकर अहिल्यादेवी होळकर मंडळ अध्यक्षा कांचन भावठाणकर छत्रपती संभाजी महाराज मंडळ अध्यक्षा सारिका हंडरगुळे यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. तसेच प्रभारी म्हणून नगरसेविका श्वेताताई लोंढे व स्मिता परचुरे काकू यांनाही यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली. या कार्यकारणीत मीनाताई भोसले यांनी विविध क्षेत्रातील महिलांना जोडून चांगले संघटन वाढवले आहे. त्यामुळे आगामी काळात लातूर शहरांमध्ये भाजपा महिला मोर्चा मजबूत स्थितीत काम करेल असे सविता ताई कुलकर्णी यांनी आपल्या शुभेच्छा पर मार्गदर्शनात सांगितले. लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी सर्व पदाधिका-यांना शुभेच्छा देऊन पुढील काळात लातूर शहराच्या जडणघडणी मध्ये त्यांची महत्त्वाची भुमिका असेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभाताई कोंडेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन रत्नमालाताई घोडके यांनी केले.
0 Comments