Latest News

6/recent/ticker-posts

आदर्श गावकऱ्यांनी केला अमित सांगवे यांचा सत्कार    

आदर्श गावकऱ्यांनी केला अमित सांगवे यांचा सत्कार



चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील अलगरवाडी येथे जेईई मध्ये संपूर्ण भारत देशातून ५२ व्या क्रमांकावर आलेल्या अमित सांगवे यांचा बसव प्रतिष्ठाण स्वंयसहायता ग्रूप व कूणबी शेतकरी गटातर्फ जल्लोषात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


    अलगरवाडी येथील ईश्वर सांगवे यांचे सुपुत्र अमित सांगवे यांनी संपूर्ण देशभरातून जेईई साठी बसलेल्या तब्बल २५ लाख विद्यार्थ्यांतून ५२ वा क्रमांक मिळवून देशभरात अलगरवाडी चे नाव केल्याबद्दल येथील नागरिकांनी अमितचे उज्वल यश पहाता ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता म्हणून बसव प्रतिष्ठान स्वयंसहायता ग्रुप व कुणबी शेतकरी स्वयंसहाय्यता गट यांच्या संयुक्त विद्यमाने अपार मेहनत घेतलेल्या अमित सांगवे व कोरोना च्या काळात अविरत पहारा लावून असलेले चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचा व अलगरवाडी गावांचं नाव ज्यांनी रोशन केले त्या आदर्श गावचे सरपंच गोविंदराव माकणे यांनीही अमितला शुभेच्छा देवून जेष्ठ नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असेही सांगण्यास विसरले नाहीत व चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्रीनिवास हसनाळे यांचाही कोरोणा काळामध्ये अलगरवाडी मध्ये विशेष लक्ष घालून केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांचाही सत्कार या ग्रामस्थांतर्फे सोमवारी संध्याकाळी शाल श्रीफळ फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबुरावजी ढोबळे यांनी केले त्या प्रसंगी सत्कार मूर्ती असलेले अमित सांगवे यांनी दहावी मध्ये १००% मार्क घेऊन उत्तीर्ण झाला होता व बारावी मध्येही ८९ % मार्क घेऊन उत्तीर्ण झाला असून जेईई मध्येही सलग ११ तास अभ्यास करून देशभरात ५२ व्या क्रमांकावर येवून नाव कमावले आसे सांगितले, तसेच पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांनीही कोरोना विषयी जनजागृती केली आणि अमित सांगवे यांना तु जे नाव कमावलंस त्या सारखच तुझ्या गावातील काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तुझ्या मागे मागे त्यांना घेऊन अमित बनवून जाशील तरच त्याचा फार मोठा फायदा होईल असेही मार्गदर्शन पर सांगितले, व चापोली येथील आरोग्य अधिकारी श्रीनिवास हसनाळे यांनी ही कोरोना सारख्या माहामारी विषयी जनजागृती केली व अमित सांगवे यांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पटणे यांनी केले तर आभार सुनील ढोबळे यांनी मानले त्याप्रसंगी संगमेश्वर पटणे, शिवलिंग माकणे ,माधव माकणे, अंजेराव खटके, बालाजी माकणे ,नागनाथ पटने, अनिल कोरे,राम पिलंगुले यांच्यासह अलगरवाडी येथील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments