दलित वस्तीकडे मदनसुरी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
मदनसुरी:(प्रतिनिधी/जीवन शिंदे) निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील दलित समाजाच्या वस्तीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्याने घाण पाणी व चिखलातून वाट काढावी लागत आहे.से सर्व प्रकार,ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती असूनसुद्धा ग्रामपंचायत व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मातंग समाजाचा मोठा रोष प्रशासनावर आला आहे. लहान मुले,महिलांना दररोज अश्याच रस्त्यातून जावे लागत आहे सर्व वस्तीतील सांडपाणी पावसाचे पाणी तेथे जमा होत असल्याने संध्याकाळी अंधारात चालताना त्या घाण पाण्यातुन चिखलातून वाट काढावी लागत आहे.आशा रस्त्यांमुळे,शवयात्रा वाहने,किंवा एखादा रुग्ण दवाखाण्यात पोहचवणे अत्यंत हलाखीचे झाले आहे,या रस्त्यावर वावरण्यासाठी लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मागासवर्गीय असल्यानेच आम्हाला व आमच्या वस्थीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याचे सत्यभामा शिंदे व अन्य महिलांनी सांगितले आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी विनंती समस्त येथील समाज बांधवातून होत आहे.
0 Comments