शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,हजार रु.अनुदान द्या;मनसे चाकुरच्या वतीने तहसिलदाराना निवेदन चाकूर:{प्रतिनिधी}मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असुन शासनाने याची नोंद घेवुन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रू नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका चाकुर च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मनसेचे चाकुर तालुका अध्यक्ष निरंजन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना हे निवेदन देण्यात आले .यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन ,मुग,उडीद ,तुर आदी विविध पिकांची पेरणी केली .त्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे बी उगवलेच नाही म्हणुन दुबार पेरणी करावी लागली.या संकटातून बाहेर पडत नाही तोपर्यंतच पिके हातातोंडाशी आली असतानाच मुसळधार पाऊस झाला .त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास ही या पावसाने हिरावून घेतला .या मुसळधार पावसाने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्या मुळे शासनाने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रू अनुदान मदत स्वरूपात देण्याची मागणी मनसे तालुका चाकुर च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी यांच्या सह कृषी विभाग तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,तुळशीदास माने,मारोती पाटील ,बबन मद्दे,अभंग वाघमारे,करण अर्जुने,शिवाजी श्रीमंगले यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments