"चार आणे की मुर्गी, बारा आने का मसाला "पथविक्रेता आत्मनिर्भर योजना एमआयएम ने अडचणी दूर करण्याची केली मागणी
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख) प्रत्येक तालुक्यात जे पथविक्रेते आहेत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान योजनेतून दहा हजार रुपये बँकेतून कर्ज स्वरूपात मिळणार आहेत या योजनेचा फायदा घेण्यासाठी पथ विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील बँक त्यांना कर्ज स्वरूपात रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. सदरील योजनेसाठी विक्रेत्याकडून महा-ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करायला लावला जातोय, हा भरला गेलेला अर्ज पालिकेच्या वेबसाइटवर पाठवला जातो. पालिका हा अर्ज बँकेकडे वर्ग करत आहे. मात्र त्याला आवश्यक असलेला एल आर ओ. हे प्रमाणपत्र जोडत नसल्याने सदरील अर्ज हे मंजूर केले जात नाहीत. पथ विक्रेता ज्या वेळेला बँकेत जातो त्या वेळेला त्यांना पालिकेचे 'LOR' प्रमाणपत्राची मागणी करतात. हे प्रमाणपत्र नसल्यामुळे आम्ही तुमचे फाईल बाजूला ठेवली आहे. तुमचे कर्ज मंजूर करू शकत नाही. असे स्पष्ट उत्तर बँकेचे अधिकारी देत आहेत. पथविक्रेते ज्यावेळेला पालिकेत जाऊन संबंधित व्यक्तीला त्याची मागणी करतात. त्यावेळेला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता छोट्याशा कर्जासाठी धावपळ करावी लागत आहे. म्हणजेच 'चार आणे की मुर्गी अन बारा आने का मसाला.' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सदर प्रमाणपत्र देण्यासाठी पालिकेला आदेशित करावे अशी मागणी एमआयएमचे माजी शहराध्यक्ष अफसर शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0 Comments