धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबदचे निवेदन विकास माने (उपविभागीय अधिकारी, निलंगा) यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले धनगर समाज हा संविधानिक न्याय हक्का प्रमाणे अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत ३६ नंबर वर उरान धनगर असून आतापर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेहून धनगर समाजाची सामाजिक , शैक्षणिक , राजकीय ,विकासापासून धनगर समाज वंचित आहे तरी शासनाने धनगर समाजाच्या संविधानीक देयेक असलेले अनुसूचित जमातीची आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावे असे निवेदनाद्वारे केले आहे निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष झटींग म्हेत्रे , सदस्य नामदेव काळे ,युवराज जोगी , मुरलीधर अंचुळे ,भगीरथ वरवटे ,संदीप वजीर , इंद्रजित कोकरे ,लक्ष्मण पाटील आदी जणांची निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
0 Comments