वडवळ नागनाथ येथे संजीवनी बेटावर यंदा शुकशुकाट
वडवळ नागनाथ:(प्रतिनिधी/गोरखनाथ खरटमोल) येथील सुप्रसिद्ध असे पर्यटनाचे व दुर्मिळ वनस्पतींची खान असलेले संजीवनी बेट आहे. येथे दरवर्षी प्रमाणे उत्तरा नक्षत्रात या बेटावर पंधरा दिवसांसाठी पर्यटक भाविक व व्याधिग्रस्त लोकांची रेलचेल चालू असते व शेजारील चार ते पाच राज्यातून तसेच विविध जिल्ह्यातून आजूबाजूच्या परिसरातून अनेक लोक मोठ्या श्रद्धेने येत असतात. तसेच येथे नऊनाथा पैकी प्राचीन असे श्री. वटसिद्ध नागनाथ मंदिर आहे. अनेक भाविक प्रथम या प्रसिद्ध वटसिद्ध नागनाथ मंदिरा समोर मोठ्या श्रद्धेने माथा ठेवून येथून संजीवनी बेटा कडे मार्गस्थ होत असतात. हे सर्व दरवर्षी चालत असत येथील दरवर्षीप्रमाणे बाजारपेठा फुलून दिसत असतो पण यावर्षी covid-19 प्रादुर्भावामुळे या वर्षीचा उत्तरा नक्षत्रात मात्र बेटावर शुकशुकाट दिसून आला.
0 Comments