Latest News

6/recent/ticker-posts

लव लातूर जीव लातूर टीम च्या रक्तदान शिबिरात ३५ जणांनी केले रक्तदान

लव लातूर जीव लातूर टीम च्या रक्तदान शिबिरात ३५ जणांनी केले रक्तदान



लातूर:{प्रतिनिधी} आज संपूर्ण जगावर कोविड-१९ या रोगाने कहर केला आहे. दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या आणि रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा असल्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागतं आहेत. शहिद ए आझम वीर भगतसिंहजी यांच्या ११३ व्या जयंती निमित्तचे आवचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ऐकून ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आता पर्यंत हजारो रुग्णांना लव लातूर जीव लातूर टीम ने जीवनदान दिले आहे. रक्ताची गरज म्हंटल कि कशाचाच विचार न करता रक्ताची बॅग उपलब्ध करून देणे. हा मुख्य उद्देश टीम चा असतो. या वेळी लव लातूर जीव लातूर टीम चे उमेश कांबळे, वैभव दत्तनगिरे, रत्नरानी कोळी, शाम जाधव, राहुल रोडे, वंदना बायस, देवराज पोतदार,प्रशांत येवरीकर, सजय सुरवसे व भालचंद्र रक्तपेढी चे महेंद्र घांगले, अमर बुरबुरे, व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments