औसा पालिकेकडून कोरोना विषयी जनजागृती मोहीम
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)औसा. शहरांमध्ये covid-19 रुग्न वाढत असल्याने नगरपालिकेकडून दक्षता म्हणून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत खुद्द नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण स्वतः तळमळीने जनतेला कोरोणा संदर्भात काय दक्षता घेतली पाहिजे याविषयी माहिती स्पीकर द्वारे देत होते.
"अगदी लहान लेकराला समजवल्यास तो समजू शकतो व घडलेल्या चुका पुन्हा करत नाही. आम्ही वारंवार सूचना करूनही तुम्ही कोरोना संदर्भात दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाहीत, असे करू नका असे केल्यास यात आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे नुकसान होईल म्हणून सर्वांनी मास्क घालूनच घराबाहेर पडा व दुकानदार यांनीदेखील विना मास्कच्या ग्राहकाला वस्तू देऊ नका "अशा पद्धतीच्या सूचना स्वतः तानाजी चव्हाण करत होते.ज्या गाडीमध्ये या सूचना बसून दिल्या जात होत्या त्या गाडीची चालक खुद्द नगराध्यक्ष अफसर शेख दिसून आले.
मागील अनेक दिवसापासून ही मोहीम पालिकेतर्फे राबवली जात आहे. मात्र स्थानिक नागरिक या सर्व सूचनांकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत होते . शहरात अनेक जण विना मास्कचे फिरत असताना चे चित्र दिसून येते.जे नियमांचे पालन करत नव्हते अशा दुकानदारांना व नागरिकांना पालिकेकडून दंड आकारण्यात येत होता.
या मोहिमेत पालिकेचे सर्व कर्मचारी ,नगरसेवक सहभागी होऊन प्रत्येक जण नागरिकांना नियमाविषयी माहिती देत होते.
0 Comments