मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा;आमदार सतिश चव्हाण यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
{बाबुराव आगलावे}
लातूर: गेल्या काही दिवसा पासुन मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने येथील शेतक-याचे अतोनात नुकसान झाले असुन एन काढणीच्या वेळी मुग , उङीद पिके शेतक-यांच्या हातातुन गेली आहेत तर ऊस, कापुस, सोयाबीनच्या शेतीचे अतिवृष्टीने प्रचंङ नुकसान झाल्याने शेतकरी ह्या अतिवृष्टीने अर्थिक संकटात सापङले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ मराठवाङ्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना अर्थिक मदत करावी व संकटात सापङलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सतिश चव्हाण यांनी मुख्यमंत्रयाकङे केली आहे.
मागील काही वर्षांपासुन मराठवाङ्यातील शेतक-यांना कधी कोरङा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न मराठवाङ्यातील शेतक-यांना पङला आहे. त्यात या वर्षी चांगले उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतक-यांना असताना मागील दहा ते बारा दिवसा पासुन मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . मराठवाड्यात अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असुन शेतक-यांच्या हाता तोंङाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिरिक्त पावसाने मुग, उङिद हि पिके रानातच कोंब फुटून हातची गेली आहेत तर सोयाबीन, कापुन, मोसंबीच्या शेतात पाणी साचल्याने या शेतीचे प्रचंङ नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर ऊस, मका, बाजरीचे पिके आङवी झाली आहेत. अनेक शेतक-यांनी कर्ज काढुन पिकाची लागवङ केली आहे. मात्र या अतिवृष्टीने, पिकांच्या नासाङीमुळे शेतीत केलेला खर्च हि वसुल होणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक अङचणीत सापङले असल्याने मराठवाङ्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून अर्थिक अङचणीत सापङलेल्या शेतक-यांना मदत करूण दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सतिश चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्याकङे केली आहे.
0 Comments