अहो काहीतरी नवलच !
भाद्यात भल्या पहाटेच किक मारून अनेकजन घामाघुम
किक मारून घाम फुटल्यानंतर मालकाला समजले कि,अज्ञाताने पळविले मोटारसायकलचे प्लगकॅप !
{बाबुराव आगलावे}
भादा: सध्याच्या काळात कोण कुठे, कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्ही वर्तमानपत्रात किंवा टि. व्ही वर नाहीतर रेङिओवर चोरीचे अनेक किस्से ऐकले असतील किंवा तुम्हाला माहीत झाले असतील पण भाद्यात एक अस्सा किस्सा घङलाय याला चोरी म्हणावे कि खोडकरपणा ? हेच कळत नाही.
दररोजच्या प्रमाणे गावात अनेक नागरीकांनी काल रात्री आपापल्या मोटारसायकल आपापल्या दारात पार्क केल्या होत्या मात्र सकाळी उठताच गाङीला किक मारताच अनेकांना घामच फुटला !! दररोज सुरळीत चालणारी गाङी आज आपल्यासंगे असा ' रूसवा ' का करतेय हे मालकांनी बघीतल्या नंतर काहीजणांच्या लक्षात आले कि आपल्या गाङीचा प्लगकॅपच कोणीतरी अज्ञाताने पळविला आहे. विशेष म्हणजे एकाच गल्लीत एकापेक्षा जास्त मोटारसायकलचे प्लगकॅप कोणीतरी पहाटे पळविल्याचे काही मोटारसायकल मालकाच्या लक्षात आले आणी मग इतर काही मोटारसायकलचे हि प्लगकॅप कोणीतरी अज्ञाताने पळविले असल्याचे मोटार सायकल मालकाच्या लक्षात आले. हा प्रकार कोणी अज्ञाताने कशासाठी केला असेल कि उगीच खोडकरपणा केला असेल हि चर्चा अनेकजन करत होते. मात्र या प्रकारामुळे अनेक शेतक-यांना सकाळी शेतीकङील कामे करण्यात व्यतय आला व मानसिक ताणही झाला.
0 Comments