जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते प्रशांत स्वामी यांचा सत्कार
असोसिएशनचे राज्याचे सचिव बाळा चव्हाण यांनी रेकॉर्ड झाले बाबत कळविले व नॅशनल रेकॉर्ड झालेल्या खेळाडूची यादी प्रकाशित केली
लातूर:(क्रीडा प्रतिनिधी) ३ री राष्ट्रीय मास्टर गेम क्रिडा स्पर्धा २०२० दि.९/२/२०२० रोजी वडोदरा (गुजरात) येथे संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्टाचे प्रतिनिधित्व करत लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, पोलिस दलात कार्यरत असलेले खेळाडू प्रशांत विश्वनाथ स्वामी यांनी अॅथलेटिक्स मधील ११० मी अडथळा या क्रिडा प्रकारामध्ये १९.६५ से वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्ण पदकासह राष्ट्रीय रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड आपल्या नावे करत ४०० मी अडथळा द्वितीय क्रमांक पटकावला व रजत पदक मिळवले अभिमानाने महाराष्टाराची मान उणचावली आहे.गेल्या तीन वर्षापासून एस.एन.बुरगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संकुल येथे सराव करत आहेत. लातूर जिल्हा क्रीड़ाधिकारी महादेव कसगावड़े यांनी प्रशांत स्वामी यांचा सत्कार करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments