निटूरात कोरोनाचा उद्रेक, एका महीलेचा कोरोनामुळे मृत्यू तर उपकेंद्राअंतर्गत बाधीत रुग्णांची शंभरी पार
निटूर:{प्रतिनिधी} निटूरात कोरोनाचा धोका वाढला आहे तर आज एका महीलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून निटूरच्या उपकेंद्राअंतर्गत आत्ता पर्यंत शंभर बाधीत रूग्नांची नोंद झाली आहे त्यामुळे प्रशासन निटूर मधली कोरोनाची साखळी तोडणार की आणखी वाट पाहणार हा खरा प्रश्न आहे. जगभरात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे हा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत ही पसरला आहे निटूरमध्ये आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रा अंतर्गत १०१ कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे. निटूरात एका महीलेचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे त्यामुळे निटूरमध्ये घबराहट पसरली आहे. निटूरमध्ये सुरूवातीला बाधीतांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती माञ आज निटूर उपकेंद्राने बाधीतांचा आकडा शंभरी पार केल्याचे व सांगण्यात आले गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असताना गावात कुठेच निर्जंतुकिकरण होत नाही त्यामुळे कोरोनाला कसं हरवायचं हा प्रश्न ग्रामस्थाला पडला आहे. निटूरमध्ये मृत्यू पावलेल्या महीलेला ञास होत असल्याने पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला निटूरात कोरोना वाढीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून तो रोकण्यासाठी गावात कसलीही उपाय योजना कार्यरत नाही कुठे फवारणी नाही तर गावातील नागरीक विना मास्क खूले आम पणे फिरत आहेत त्यामुळे निटूरात कोरोनाची भिती संपल्यात जमा असल्याचे दिसते आहे निटूरात अनेक रुग्ण निघत असताना गावातील नागरिक भिती पोटी रूग्णालयात तपासणी करण्यासाठी जात नाहीत त्यामुळे या संसर्गाची साखळी तुटत नाही लोकांना समूपदेशन करणे गरजेचे आहे.
0 Comments