Latest News

6/recent/ticker-posts

सावधान:ओटीपी विचारला तर सांगू नका जाणून घ्या काय आहे कारण

ओटीपी विचारला तर सांगू नका ? जाणून घ्या काय आहे कारण



हिल्या काळात चोरी लुट घरी जाऊन प्रत्यक्षात गुन्हेगार करत होते आताही करतात पण ते प्रमाण थोड्याफार प्रमाणात सध्या कमी झाले आहे पण आता ऑनलाइन फ्रॉड द्वारे आपल्या बँक खात्या मधून सायबर क्रिमिनल बँक खात्यामधील रक्कम चोरत आहेत फसवत आहेत ऑनलाइन सायबर क्राईम बद्दल आपण ऐकले असेलच किंवा आपल्यापैकी अनेकांना बरोबर अशा प्रकारचे फसवणूक सायबर फ्रॉड झाल असेल...हे सायबर क्रिमीनल आपल्याला बँकेचे अधिकारी वा कर्मचारी म्हणून कॉल करतात वा कोणत्याही प्रतिष्ठित कंपनीचे कर्मचारी आहेत असे भासवतात व आपल्याला CVV किंवा OTP मागतात व तुम्हाला सांगितले जाते की आपल्या एटीएम चा कालावधी संपलेला आहे किंवा आपले एटीएम बंद होणार असे सांगून फसवून आपल्याकडून संबंधित माहिती घेतात आपल्याकडे असलेल्या एटीएमच्या कार्ड मागील सोळा डिजिट चे नंबर आहेत त्यामधील शेवटचे चार नंबर विचारतात किंवा आपल्या मोबाईल वर ओटीपी आला आहे तो ओटीपी सांगा आपल्या कार्ड चे इंटरनेट बँकिंग कंटिन्यू होईल चालू राहील असे सांगतात आणि आपण सहज अशा फ्रॉड कॉल वर विश्वास ठेवतो आज काल आपण सगळ्यांचा असा समज झाला आहे की आता सगळे ऑनलाईन झालेले आहे आपल्याला बँकेला जाण्याची आवश्यकता नाही असे समजून आपण संबंधित सर्व माहिती बँकेच्या खात्याची सर्व माहिती या संबंधित फ्रॉड करणाऱ्या लोकांना नकळतपणे देतो.


अशाप्रकारे एक नाही दररोज हजारो लाखो सायबर क्राईम फ्रॉड होत आहेत आणि आपले सरकार सायबर क्राईम संबंधी ठोस पाऊल उचलताना दिसत नाही ही माझ्या समजण्या पलीकडची बाब आहे तेच ते जुने कायदे असल्यामुळे पोलीस ही हतबल आहेत लोकांचे बँक खाते सायबर क्रिमीनल साफ करत आहेत आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे असे नाही का वाटत आपल्याला या संबंधित Google pay fraud,OLX fraud,upi fraud,fake shopping sites या माध्यमांतून रोज लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे अनेकदा तर fortuner,mahindra suv, BMW आदी लक्झरिअस गाड्या लकी ड्रॉ मध्ये लागल्या असे सांगून फसवणूक केली जाते यासंबंधी जनप्रबोधन जनजागरण महत्त्वाच आहे ही नसल्यामुळे सायबर क्रिमिनल्स लोकांना बेवखुप बनवून त्यांची मेहनतीची कमाई लुटत आहेत आणि आपण त्यांच्या या आमिषाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेत आहोत 



यासंबंधी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याकडे सायबर फ्रॉड/क्राईम संबंधी कोणतीही प्रभावी कायदे अस्तित्वात नाही केंद्र सरकार व राज्य सरकारांनी या संबंधी प्रभावी कायदे बनवावे पोलीस विभागातील सायबर सेल ला प्रत्येक जिल्हा स्तरावर खूप जास्त प्रमाणात मजबूत करावे व काही मर्यादित कालावधी मध्ये दाखल झालेला FIR संबंधी तपास करावा जेणेकरून सायबर क्रिमीनल लवकरात लवकर पकडले जाऊन त्यांना मा.न्यायालयामार्फत कडक शिक्षा व्हावी


एकीकडे केंद्र शासन डिजिटल करन्सी ला महत्व देत आहे तर त्या संबंधी कायदे ही मजबूत प्रभावी असले पाहिजे नाहीतर तेच आपले जुने IT ACT 2000 66C,66D आणि 420 IPCकायदे लोकांच्या माथाडी मारून द्या काय होत या कायद्याने सरकारला लवकरच काहीतरी प्रभावी उपायोजना करावे लागणार रोज नेहमी एका पेक्षा एक मोठे सायबर फ्रॉड गुन्हे होत आहेत ह्या संबंधात केंद्रशासनाने एक नवीन कायदा करून सायबर फ्रॉड मध्ये लोकांची गेलेली रक्कम ही केंद्र शासनाने संबंधित फिर्यादी व्यक्तीस द्यावी व नंतर ती रक्कम आरोपीकडून वसूल करून घ्यावी सरकारच्या IT ACT 2000 66C,66D आणि 420 IPCने काही साध्य होणार नाही व प्रत्यक्षात फिर्यादीला याचा काय फायदा होतो हे संशोधनाचा विषय आहे.1,2,5,10 वर्ष उलटूनही लोकांना सायबर फ्रॉड द्वारे गेलेली रक्कम पैसे परत भेटत नाहीत तर अशा कायद्यांचा काय उपयोग आणि काही सायबर क्राईम फ्रॉड रिलेटेड केसेसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते यासंदर्भात सायबर क्राईम मधील ज्ञानाचा अभाव हे एक कारण असू शकते वा अजून काही अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पहावयास मिळतील


 सायबर क्राईम फ्रॉड संबंधी कोणताच प्रभावी कायदा अस्तित्वात नाही लोकांना झालेल्या फ्रॉड संबंधित रक्कम कोण देणार कसे देणार यासंबंधी काय उपाय आहेत या बाबी मला स्पष्ट होत नाहीत केंद्र सरकार व राज्य सरकार यासंबंधी तात्काळ ठोस उपाय योजना प्रभावी कायदे बनवण्याची गरज आहे जोपर्यंत प्रभावी कायदे बनत नाही तोपर्यंत लोकांच्या अडचणी दूर होणार नाहीत आणि सध्या जनजागृती जागरूकता हाच एकमात्र उपाय आपल्याकडे उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या परिवार मित्रमंडळींचा अशा सायबर फ्रॉड क्राईम संबंधी बचाव करू शकता. stay safe stay care



शब्दांकन: मोहम्मद उस्मान{नांदेड येथे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून सायबर क्राईम अभ्यासक आहेत)


usmanlegaladvoiser@gmail.com


Post a Comment

0 Comments