सावधान ! प्रेम करताय ? तर मग ओळखा आपल्या ' रंग प्रेमाचा
काळीज आणी भावना माणसाच्या जिवनात अशा गोष्टी आहेत ज्याच्या जाळ्यात अङकलेला माणुस आपल्या जिवनाची दिशाच बदलुन जातो. आणी याच भावनिक गुंतागुंतीचं कोङं दिग्दर्शकाने सोङवलय रंग प्रेमाचा या लघुपटातुन
{बाबुराव आगलावे}
प्रेम हे निसर्गाची देणगी असून समाजामध्ये वेगवेळ्या प्रकारे प्रेमाची व्याख्या आहे.मातेला जेव्हा पहिल्यांदा आपल्या गर्भार बाळ असल्याची जाणीव होते तेव्हा पासूनच आई आपल्या बळावर प्रेम करत असते. तर मोठी बहीण आपल्या छोट्या भावावर. तर एखादी प्रियेशी आपल्या प्रियकरावर प्रेम करत असते अश्या कितीतरी प्रकारे प्रेमाची रूपे असताना. मात्र सध्या गैरसमजामुळे व प्रियकर अथवा प्रियेशी यांनी एकमेकांना समजून न घेतल्यामुळे सध्या सुंदर अश्या प्रेमालाच गालबोट लागले आहे. काहीजण अंगावर पेट्रोल टाकून तर काहीजण ऍसिड टाकून आपल्या प्रेमाला मूठ माती देताना दिसून येत आहे. हाच विषय घेऊन साई इंटरटेन्मेन्ट प्रस्तुत रंग प्रेमाचा ही शॉर्ट फिल्मची निर्मिती पत्रकार दिलीप मोहिते यांनी केली आहे. या फिल्म मध्ये टवाळखोर असणारा मुलगा कॉलेज तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिला खरे समजल्यावर तिच्या तोंडावर ऍसिड फेकून मारण्याच्या तयारीत असणारा मुलगा त्या तरुणीच्या मनात असणारा आदर्श व त्याच्या विषयी असणाऱ्या प्रेमापोटी त्याला सुधरवण्यासाठी केलेला प्रयत्ना मुळे तो ऍसिड फेकण्या ऐवजी माफी मागतो व तो स्वतःचा काहीतरी करून दाखवण्याची शपथ घेतो. असे चित्रित केले आहे.यामुळे समाजात अश्या विकृती घटना थांबवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयोग असल्याचे निर्माता दिग्दर्शक दिलीप मोहिते यांनी सांगितले. तर निर्माता व दिग्दर्शक दिलीप मोहिते यांनी आता पर्यत ऊस तोड कामगारांच्या जीवनावर पान्हा मायेचा व मुलींवरील होणाऱ्या अत्याचारामुळे वडिलांनाच नको असलेली मुलगी कशी हवेशी होते व आय पी एस अधिकारी होऊन रोड रोमिओचा बंदोबस्त करते यावर भाष्य करणारी फिल्म दुर्गा आणि आता रंग प्रेमाचा या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजात चालेल्या विदारक घटकावर प्रकाश टाकला आहे. तर रंग प्रेमाचा या शॉर्ट फिल्मची स्टोरी, पटकथा,संवाद, लेखन, कॅमेरामन तसेच निर्माता दिग्दर्शक पत्रकार दिलीप मोहिते असून सहाय्यक दिग्दर्शक अविनाश जगताप आहेत. तर संकलन दादासाहेब शिंदे यांचे असून निलेश गवळी, मृणाली कुलकर्णी, पियुशा पाटील.प्रकाश भोसले देवा देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
0 Comments