Latest News

6/recent/ticker-posts

चापोलीत कोरोना योध्दाचे दुःखद निधन;ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली

चापोलीत कोरोना योध्दाचे दुःखद निधन; ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली



चाकूर:{ता.प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी} चाकूर तालुक्यातील चापोली येथे कोरोना योद्धा माजी सैनिक गजेंद्र स्वामी यांना शाररीक अंतर पाळून दि.१२ शनिवारी आदरांजली वाहण्यात आली.


गजेंद्र स्वामी यांचे दि.१० गुरुवारी आकस्मित निधन झाले.त्यांनी कोरोना विषाणूच्या महामारी दरम्यान आपल्या चार चाकी वाहणाच्या साह्याने ध्वनीक्षेपकाद्वारे चापोली व परीसरात विनामूल्य जनजागृती केली होती.त्यांच्या या आकस्मित निधनाने चापोलीकरांनी एक कोरोना योद्धा गमावला आहे.या अनुषंगाने येथील युवक रमेश पाटील यांनी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गावचे तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर होणराव, माजी चेअरमन मारोती होणराव,माधव तरगुडे,नारायण जामकर,माजी पं.स.सदस्य निलेश मद्रेवार,माजी सैनिक बालाजी शेवाळे,बसवंत आलमले,हणमंत सोनटक्के,बळीराम मुर्गे,मारोती होनराव,शिवाजी चाटे,सिकंदर पटेल,वैजनाथ श्रीमंगले,भालचंद्र हुलगुंडे,शादुल शैख,बालाजी नवाडे,बळीराम शेवाळे,भागवत शंकरे,बाबू कोरे,मिलिंद शंकरे,संदिप आबंदे,बस्वराज स्वामी,बापूराव पाटील, विश्वनाथ स्वामी,मिरा बोंबडे,वृदांवनी वाघमारे, अर्चना ब्र-हानपूरे,हिरकणबाई भालेराव, आदींनी आदरांजली वाहिली.


Post a Comment

0 Comments