Latest News

6/recent/ticker-posts

शाहीर सागर गौरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप यांची सुटका करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी

शाहीर सागर गौरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप यांची सुटका करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी



देवणी:(प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड) शाहीर सागर गोरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप यांची त्वरीत सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.नरसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने देवणीचे तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानचे सदस्य आणि कबिर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना NIA ने अटक केली आहे.यानां NIA कडुन अनेक दिवस चौकसी साठी बोलावले गेले.या दोघाना माफिचे साक्षिदार बना नाहीतर तुम्हाला अटक करतो.अशा पध्दतिच्या धमक्या देण्यात येत होत्या.तुम्ही हे CRPC कायदा 164 कलमा अंतर्गत माफीचे साक्षीदार बना अणि आम्ही सांगतोय त्या प्रमाणे गुन्हा मान्य करा.अन्यथा आम्ही तुम्हाला संबधित गुन्ह्याखाली अटक करू.


     दोन्हीही शाहीरांनी NIA च्या खोट्या षडयंत्राला ऊधळुन लावले.भिमा-कोरेगाव-एल्गार परिषध प्रकरणी आतापर्यंत देशभरातील मानवाधिकार कार्यकर्ते ,वकील,प्राध्यापक आणि साहित्तिकांच्या अटका झाल्या आहेत.यामध्ये आता ज्यांनी जनतेची दु:ख, वेदना,संघर्षात समरस होऊन या विषमतावादी व्यवस्थेला संविधानिक मार्गाने विरोध केला.अशा अंबेडकरी कार्यकरत्यांचा आवाज दडपण्याच काम सरकारन केल आहे.आणी हे स्पष्ट झाले आहे की एल्गार भिमा कोरेगाव खटल्यात पुणे पोलिसाकडे कांही ठोस पुरावे नाहीत,व NIA कडे ठोस पुरावे नाहीत.आणि म्हणुनच आता सामाजिक कार्यकरत्यावर अशा प्रकारे दबावतंत्र लादले जात आहे.अशाच खोट्या नाट्या सबबिखाली शाहीरा ज्योती जगताप यांनांही NIA ने ATS कडुन केलेली आहे.


      लातुर जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही शाहीर सागर गोरखे,शाहीर रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांच्यां अटकेचा धिक्कार करतो.आणि त्यांच्यां सुटकेसाठी शासनाला विनंती करतो.अण्यत: येणा-या काळात लातुर जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र अंदोलन करण्यात येईल अशा मागणिचे निवेदन देवणी तहसिलदार यांनां देण्यात आले.या निवेदनावर लातुर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा.नरसिंग सुर्यवंशी,दिलीप शिंदे,अक्षय शिंदे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे,आंगद गायकवाड,नरसिंग बोरोळकर,बुध्दिवंत सोनकांबळे ईत्यादिच्यां स्वाक्ष-या आहेत.


Post a Comment

0 Comments