Latest News

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरूवात होत नसल्याने आयुक्तांना मी लातूरकरचे पुन्हा निवेदन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरूवात होत नसल्याने आयुक्तांना मी लातूरकरचे पुन्हा निवेदन 



लातूर:(प्रतिनिधी) गेल्या अनेक महिन्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरनाचा प्रश्न प्रलंबित आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन देखील प्रत्यक्ष कामाला सुरवातच झालेली नाही. शिवाय मनपाच्या सर्वसाधारण हा ठराव मंजूर होऊन देखील सत्ताधारी आणि विरोधकांकडून लातूरकारांची दिशाभूल केली जात आहे. हाच मुद्दा उपस्थित करीत महापुरुषांच्या नावाने होत असलेले राजकारण थांबवावे आणि अजेंड्यावर असलेले विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी मी_लातूरकर च्या वतीने करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते महानगरपालिका या दरम्यान हालगी नाद करून सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. शिवाय रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र मार्च पासूनच लॉकडॉऊन असल्याने मी लातूरकर सामाजिक भावनेने गप्प होते. आता देशात राज्यात व जिल्हातील लॉकडॉऊन परिस्थिती हटवली गेली आहे. तरीही पार्कच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरूवात होत नसल्याने आयुक्तांना मी लातूरकरने पुन्हा निवेदन दिले आहेत. व येणाऱ्या पंधरा दिवसांत कामाला सुरूवात व्हावी अन्यथा मी लातूरकर तर्फे आक्रमक पवित्रा घेतला जाईल. असे मनपा आयुक्त महापौर व उपमहापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे सदर निवेदनात जर पंधरा दिवसांत कामाला सुरूवात न झाल्यावर महानगरपालिकेत गणिमीकावा पध्दतीने अधिकारी व राजकारणी याची गच्ची करणार असा इशारा  मी लातूरकरचे उमेश कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


Post a Comment

0 Comments