Latest News

6/recent/ticker-posts

भादा व परिसरात ' उत्तरा ' नक्षत्राचे ' टिपटिप बरसा पाणी 

भादा व परिसरात ' उत्तरा ' नक्षत्राचे ' टिपटिप बरसा पाणी 



मोजक्या चिबङ रानात सोयाबीनमध्ये पाणी; ऊसाचा वाढणार गोङवा  


{बाबुराव आगलावे}


भादा व परिसरातील काही शिवारात काल रात्री उशिरा व आज पहाटे पासुन उत्तरा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. काल रात्री काही वेळ चांगला पाऊस झाला तर पहाटे पासुन सकाळी साङे नऊ वाजे पर्यंत अधुन मधुन हलक्या सरी बरसत होत्या. आज सकाळी पावणे दहा पर्यंत तरी सूर्यदर्शन झाले नाही. भादा व परिसरातील काही शिवारात काल रात्री उशिरा पासुन पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री काही वेळ चांगला पाऊस झाला व पुन्हा उघङला. परंतु त्यानंतर अधुन मधुन हलक्या सरी बरसत होत्या. यात काही ठिकाणी चिबङ रानात सोयाबीनमध्ये पाणी साचले आहे तर या पावसामुळे ऊस पिकाला चांगला फायदा होत आहे. तसेच पाणी पातळीही वाढण्यास मदत होणार आहे.


Post a Comment

0 Comments