Latest News

6/recent/ticker-posts

वडवळ नागनाथ येथील महात्मा बसवेश्वर चौकात राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रध्दांजली अर्पण

वडवळ नागनाथ येथील महात्मा बसवेश्वर चौकात राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रध्दांजली अर्पण



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज- अहमदपूरकर यांना येथील ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. येथील महात्मा बसवेश्वर चौकात शिव किर्तनकार विश्वनाथ स्वामी महाराज, नागनाथ मठपती, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कसबे,  उपसरपंच वैभव पाटील यांनी राष्ट्रसंत, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून आरती केली. 


     यावेळी शिव कीर्तनकार स्वामी महाराज यांनी राष्ट्रसंतांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा इतिहास सांगत त्यांनी विज्ञान आणि आध्यामाची सांगड घालून मानव कल्याणसाठी त्यांनी केलेले कार्य आणि सन २०१५ मध्ये वडवळ नागनाथ येथील प्रसिद्ध संजीवनी वनौषधी बेटावर केलेले श्रावण महिन्यातील ७९ वे तपोनुष्टान हे वडवळकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे. 


     या कार्यक्रमास संतोष आचवले, नागनाथ बेंडके, शिवराज आचवले, माणिकराव हलिंगे, इब्राहिम चौधरी, बालाजी बेंडके, श्रीधर बेरकिळे, वैजनाथ नंदागवळे, ज्ञानेश्वर बेरकिळे, राजकुमार वाडकर, बसवराज कल्याणे, सदाशिव नंदागवळे, अमित वाडकर, वैभव रेकुळगे, शिवराज वाडकर, नवनाथ भेटे, धोंडीराम बेंडके, भगवान लोखंडे, विष्णूकांत चिंतलवार, प्रभाकर भेटे, वीरभद्र बेरूळे, नागनाथ हाके, लक्ष्मण टेकाळे, शिवशंकर बेरकिळे, अनिल येवंदगे, बालाजी मेनशेट्टे, संतोष नंदागवळे, राम हाके, रामेश्वर मिरकले, लक्ष्मण बेरकिळे, राजकुमार स्वामी,  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments