Latest News

6/recent/ticker-posts

दुःखद बातमी:औशाचे माजी नगराध्यक्ष अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे निधन

औशाचे माजी नगराध्यक्ष अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे निधन



औसा: औसा चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस चे ज्येष्ट नेते अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे आज दुपारी लातुर येथील एका खाजगी दवाख्न्यात उपचारा दरम्यान निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन मृत्यु वेळी त्यांचे वय 81 वर्षाचे होते.नुकतेच त्यानी कोरोना वर मात केली होती.अड.म.मुजीबोद्दीन इस्माइल पटेल यांचा जिवन परिचय- जन्म.03/02/1939 औसा शिक्षण.B.A LLB 1964 पासुन वकीली व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग 1968 पासुन राजकारणात प्रवेश व नंतर नगर परिषद औसा चे नगरसेवक म्हणुन निवड सतत 35 वर्ष नगर सेवक व 17 वर्ष नगराध्यक्ष पदी विराजमान नगराध्यक्षपदाच्या काळात औसा शहराच्या सर्वांगीन विकासात भर, अनेकविध योजनांच्या माध्यमातुन शहरात शाॅपिंग काॅम्पलेक्स, रस्ते, व इतर नागरी सुविधांचे नियोजन, नगर परिषदेच्या वतीने अंत्यविधी अनुदान योजना. शहरातील शांतता व सुव्यवस्था साठी अग्रेसर राहुन औसा शहर शांतता प्रिय शहर म्हणुन नामोल्लेख. फखरोद्दीन अली अहेमद एज्युकेशन सोसायटी औसा च्या माध्यमातुन औसा शहरात उर्दु शिक्षणाची सोय. हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी औसाच्या स्थापनेत सहभागी. महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे लातुर जिल्हा अध्यक्ष म्हणुन सेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राज्य व जिल्हा पदाधिकारी म्हणुन कार्य. जमियते उल्माये मराठवाडा चे उपाध्यक्ष म्हणुन सामाजिक व धार्मिक सेवा शहरातील गरजु व गोरगरिबांना व्याजाच्या मुक्त करण्या साठी "बिनव्याजी पतसंस्थे" ची स्थापना. सर्व राजकिय पक्षांच्या कार्यकर्ते व नेत्यांशी सौहार्दाचे नाते व जनतेशी थेट संबंधा मुळे लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुले, तीन मुली व नातु, पंतु असा मोठा परिवार आहे. श्रीकुमार स्वामी महाविद्यालयाचे प्रा.लायक पटेल, हजरत सुरतशाह शाळेचे मुख्याध्यापक शफीयोद्दीन पटेल यांचे वडील व उद्योगपती हिमायत पटेल यांचे सासरे होत."मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली.


Post a Comment

0 Comments