Latest News

6/recent/ticker-posts

धनेगांव ता.देवणी येथे होत असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करावी;पोलीस अधिक्षकानां निवेदन

धनेगांव ता.देवणी येथे होत असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करावी;पोलीस अधिक्षकानां निवेदन



देवणी:{प्रतिनिधी/पुष्पक सूर्यवंशी} मौजे धनेगांव ता देवणी हे मांजरा काठी वसलेले समृध्द गांव ग्रामीण भागात पंचक्रोशीमध्ये शिक्षणाचे माहेरघर म्हणुन प्रसिध्द असलेले हे गांव आज अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे, आज या गावात गल्लो -गल्ली देशी व विदेशी दारु विक्री जोमात चालु आहे, भारत देशाचे भविष्य असलेली ही तरुण पिढी दारु कडे आकर्षित होवुन व्यसनाधिन बनत चालली आहे. त्यामूळे देशाचे भवितव्य असलेली तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय होत आहे आजपर्यंत या अवैध दारु विक्रीमूळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. यामूळे गावात मारामारी,चोरी करणे,महिलाची छेडछाड करणे इत्यादी प्रकार वाढत आहेत. या अवैध दारु विक्री करणार्‍यावरती कायदेशिर कार्यवाही करुन तात्काळ दारु विक्री पुर्णपणे बंद करावी अशी मागणी भाजयुमोचे तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार,  राम खारे, किशोर बिरादार, सौ.ललुबाई शेटकार, मूरहारी बिरादार, बालाजी बिरादार, माणीक बिरादार, सौ.उषाबाई बिरादार, उध्दव बिरादार, रामभाऊ बिरादार, गणेश बिरादार, बालाजी बिरादार, दिपक आलमले, राजकुमार बिरादार, आदीसह ग्रामस्थानी केली आहे. 


Post a Comment

0 Comments