Latest News

6/recent/ticker-posts

अलिशेर कुरेशी उपनगराध्यक्ष तर रुपेश दुधनकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड;प्रथमच कुरेशी समाजाचा उपनगराध्यक्ष

अलिशेर कुरेशी उपनगराध्यक्ष तर रुपेश दुधनकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड;प्रथमच कुरेशी समाजाचा उपनगराध्यक्ष



औसा:(जिल्हा तिनिधी/बी.जी.शेख)दि.१८ - प्रत्येक पाच वर्षांनी एका उपनगराध्यक्षा ची निवड हा फॉर्मुला असल्यामुळे एक उपनगराध्यक्ष म्हणुन अलीशेर कुरेशी यांची निवड करण्यात आली. कुरेशी समाजाला औसा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच उपनगराध्यक्षपद मिळाले. अलिशेर कुरेशी यांना उपनगराध्यक्ष तर रुपेश दुधनकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया बिनविरोध घडुन आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी आपल्या कार्यकाला मध्ये सर्व समाजाला समान स्थान देण्याचे निश्चित केले होते. त्या अनुषंगाने आज कुरेशी समाजातील पक्षाशी एकनिष्ठ अलिशेर कुरेशी यांना संधी देण्यात आली. असे असले तरी स्वीकृत सदस्य म्हणून दुसऱ्या अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लागेल असे वाटत होते. मात्र त्या सर्व कार्यकर्त्यांना डावलून दुधनकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चर्चिले जात आहे.


Post a Comment

0 Comments