चाकूर तालुक्यातील "माझे कुटुंब-माझी जबाबदारी" या मोहिम दोन टप्यात- तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे
ही मोहीम १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पहिला टप्पा व १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दुसरा टप्पा या दोन टप्प्यात राबविली जाणार या मोहिमेअंतर्गत चाकुर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार
चाकुर:(ता.प्र./सलीमभाई तांबोळी) तालुक्यांचे तहसिलदार यांनी तहसिल कार्यालयामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनांच्या आभियनांची संपुर्ण माहिती पञकार परिषदेत दिली.प्रभावी अंमलबजावणीसाठी पुर्ण प्रशासकीय यंञणा सज्ज आहे.नागरिकांनी यात सहभाग घेण्यांचे आव्हान त्यांनी केले.
कोविड-१९ विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेचे दोन टप्पेअसून पहिला टप्पा हा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर तर दुसरा टप्पा हा १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. ही मोहीम चाकुर तालुक्यातील नागरिकांसाठी असल्याने प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले.
चाकुर तहसिल कार्यालयात आयोजित पञकार परिषदमध्ये "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहीमेची पूर्वतयारीची माहिती आढावा बैठकीत डॉ.शिवानंद बिडवे बोलत होते.
तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे पुढे म्हणाले की, माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. तालुक्यात या मोहिमेचे काम १५ सप्टेंबर पासून सुरू होईल. यामध्ये प्रथम जिल्हा, तालुका ग्रामस्तरावरील समितीची स्थापना तसेच महापालिका शहरी भाग व ग्रामीण भागातील आरोग्य पथके गठीत करून आदेश निर्गमित करावेत. तसेच १६ व १७ सप्टेंबर रोजी आरोग्य पथकातील कर्मचारी व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे तर दिनांक १८ सप्टेंबर २०२० पासून या मोहिमेचातालुक्यात शुभारंभ करण्यायात आले. नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
या मोहीमेमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यासाठी वॉर्ड व गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येऊन दरदिवशी किमान ५० घरामधील व्यक्तींची चौकशी तसेच पल्स ऑक्सीमीटर व थर्मलगणच्या सहाय्याने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे डॉ.शिवानंद बिडवे यांनी सांगून या मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य शिक्षण व कोविड प्रतिबंधाचे संदेश द्यावेत. ही संपूर्ण मोहिम स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून मोहिमेचा शुभारंभ गाव, वॉर्ड, तालुका स्तरावर करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे असेही त्यांनी सूचित केले.
ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी भागासाठी जिल्हा आरोय अधिकारी यांनी आरोग्य पथके तयार करून त्याबाबतचे आदेश दिनांक १४ सप्टेंबर सायंकाळ पर्यंत निर्गमित करावेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रसाठी संबंधित तहसीलदार यांनी एका वाहनांची उपलब्धता करावी. चाकुर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची या मोहीम काळात तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. एक ही व्यक्ती आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित आरोग्य पथक व त्यावरील नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश डॉ.शिवानंद बिडवे यांनी दिले.
तालुक्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. व ही मोहीम नागरिकांसाठी असल्याने या मोहिमेत चाकुर तालुक्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले.
0 Comments