Latest News

6/recent/ticker-posts

मनसेचे अष्टामोड येथे रस्ता रोको आंदोलन; लातूर नांदेड राष्ट्रीयमहामार्ग दुरुस्ती करा

मनसेचे अष्टामोड येथे रस्ता रोको आंदोलन; लातूर नांदेड राष्ट्रीयमहामार्ग दुरुस्ती करा



लातूर: नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग लातूर ते अहमदपूर पर्यंत व पुढेसुद्धा अत्यंत खराब होऊन त्यावरती दोन दोन फूट खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,रोज अपघात होत आहेत,लोकांचे जीव जात आहेत तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येत नाही याचा निषेध नोंदवत तात्काळ रास्ता दुरुस्ती करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले.यामध्ये वाहनांच्या रांगा चार पाच किलोमीटर पर्यंत लागल्या.डॉॉ.भिकाणे यांनी जोपर्यंत महाराष्ट्र प्राधिकरण चे अधिकारी स्वतः उपस्थित राहून लेखी स्वरूपात हामी देऊन लगेच दुरुस्ती चे काम सुरू करत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतली.आंदोलन कर्त्यांची जनहितार्थ भावना लक्षात घेऊन तहसीलदार डॉ शिवानांद बिडवे यांनी पुढाकार घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले व त्यांच्या कडून लेखी घेऊन मनसेने आंदोलन संपवले.यावेळी पोलीस निरीक्षक जयवंत चौहान यांनीं कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत चोख बंदोबस्त ठेवला. या आंदोलनाला तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, उपाध्यक्ष ज्ञानोबा गुरव, जनार्धन इरलापल्ले, जिल्हाप्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे,दत्ता सूर्यवंशी,अविनाश झाम्बरे,कृष्णा जाधव,विठ्ठल पंडगे, तुळशी दास माने,मारुती पाटील, शिवणखेड शाखाध्यक्ष नागनाथ मोठेपाटील , दत्ता भालके,दत्ता साळूंके,संगमेश्वर बुच्चे,जावेद शेखआदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments