Latest News

6/recent/ticker-posts

केळगावमध्ये मुसळधार पावासामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली तर काहींना फुटले मोड

केळगावमध्ये मुसळधार पावासामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली तर काहींना फुटले मोड



केळगाव:(वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव सह परिसरात तीन दिवस झालेल्या पावसानंतर हजारो एकरवरील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे तर काही उंच भागातील सोयाबीनला मोड फुटले असल्याने परत शेतकर्यांसमोर आस्मानी सुलतानी संकट आहेे एक पावसानंतर सोयाबीन पीक काढणीला आले होते.परंतु मागील मंगळवारपासून ते गुरुपरपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे अनेक उभे पीक पाण्याखाली गेले आहे तर पठार व उंच भागावरील शिवारातील उभ्या सोयाबीनच्या शेंगला कोंम फुटले आहेत या झालेल्या पावसामुळे ओढे, नाले, तुडुंब भरून वाहत आहेत. केळगाव,लांबोटा,सावनगीरा,बुजरूकवाडी,खडकउमरगा निटूर,कलांडी,तलिखेड सह सर्व गावात दोन दिवस झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या हजारो हेक्टर सोयाबीन पाण्याखाली गेल्याने पुन्हा शेतकरी लागवडीला महाग झाला आहे. आगोदरच उडीद,मूग हातचे गेले गुढग्यायेवढ्या पाण्याखाली सोयाबीन हातचे गेल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.लाखो रु खर्च करून काढणीला आलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी दत्ता काळे,गोविंद काळे,ताहेर पटेल,जावेद मुजावर,हरी मुंजाळेया शेतकरी वर्गातून होत आहे.


Post a Comment

0 Comments