Latest News

6/recent/ticker-posts

तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी यशस्वीपणे निभवावी;आ.बाबासाहेब पाटील यांनी केले आवाहन

तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी यशस्वीपणे निभवावी;आ.बाबासाहेब पाटील यांनी केले आवाहन



चाकुर:(ता.प्र.सलीमाभाई तांबोळी) कोरोना माहामारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा अभियान सुरु करण्यात आला आहे.प्रत्येकांने आपआपल्या कुटुंबातील व्यक्तीची आरोग्यांची काळजी घ्यावी व कुटुबाला निरोगीमय बनवावे असा यामागचा उद्देश आहे.


 आज कोरोना वाढत असताना आपल्या स्वतःची वैयक्तिक जबाबदारी वाढली आहे आपण सर्वांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार आपण स्वतः आपली जबाबदारी व आपल्या कुटुंबाची जबाबदारीने घ्यावी असे आवाहन चाकूर येथे केले.


  येथील पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा चाकूर तालुक्याचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी   


   व्यासपीठावर चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे, माजी सभापती करीम साहेब गुळवे, तालुका आरोग्य अधिकारी अर्चना पंडगे, प्रभारी गटविकास अधिकारी एस.बी.गोस्वामी, सहाय्यक अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी ए.जी.गोकनवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना पडगे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, चापोली प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे अधिकारी डॉक्टर धनंजय सावंत, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, उपसभापती सज्जन लोणाळे, डॉक्टर आर.डी.टकटावळे सिद्धेश्वर पवार, आबा कवठे, अनिल वाडकर, तुकाराम जाधव उपस्थित होते. चाकूर तालुक्यातील यावर्षीचा उत्कृष्ट आशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चाकूर तालुक्यातील पंचायत समितीची विविध प्रशासकीय अधिकारी, चाकूर तालुक्यातील विविध वैद्यकीय अधिकारी, तसेच आशा कार्यकर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments