Latest News

6/recent/ticker-posts

अगोदर ' करपले ' आता हरपले ! भाद्यात शेतक-याच्या स्वप्नांचा ' चुरा ' सोयाबीनच्या झाङालाच येतोय ' तुरा !! 

अगोदर ' करपले ' आता हरपले ! भाद्यात शेतक-याच्या स्वप्नांचा ' चुरा ' सोयाबीनच्या झाङालाच येतोय ' तुरा !! 



{बाबुराव आगलावे}


भादा व परिसरात गेल्या काही दिवसापासुन पङत असलेल्या सततच्या पावसाने अनेक शेतक-याच्या शेतात सोयाबीनच्या झाङालाच हिरव्या शेंगातुन नविन झाङ फुटत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे विशेष म्हणजे मागील काही दिवसापूर्वीच पावसाने ' ओढ ' दिल्याने अनेक शेतक-याचे सोयाबीन पावसा अभावी करपले होते . तर आता अनेक शेतक-याच्या सोयाबीनधुन पाणी वाहत असल्याने अगोदर ऊन्हात ' करपले ' आणी आता पावसाच्या पाण्यात ' हरपले ' अशीच अवस्था या परिसरातील अनेक शेतक-याची झाली आहे. 


            भादा व परिसरात सुरूवाती पासुनच या वर्षी संकटाची मालिका चालु आहे. पेरणीतच अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. यातुन कसा तरी शेतक-यांनी मार्ग काढला तर मागील काही दिवसापूर्वी पावसाने चांगलीच ' ओढ ' दिल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन ऊन्हात करपले त्यानंतर मागील चार दोन दिवसा पासुन भादा व परिसरात पङत असलेल्या पावसाने अनेक शेतक-यांच्या सोयाबीनमध्ये पाणीच पाणी वाहत आहे त्यात आणखीनच भर म्हणून अनेक ठिकाणी सोयाबीनच्या उभ्या झाङालाच शेंगातुन नविन झाङ फुटत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. याचा परिणाम नक्कीच सोयाबीनच्या उत्पादनावर होणार असुन शेतक-याच्या या नुकसानीचा शासनाने विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. 


      अगोदरच मुग पिकाला पावसाचा फटका बसला आहे त्या अगोदर दुबार पेरणीचं संकट आमच्यावर आलेच होते आता दुष्काळात तेरावा म्हणुन कि काय सोयाबीन पाण्यात असुन त्यात उभ्या झाङालाच शेंगा फुटत आहेत . या नुकसानीचा शासनाने विचार करूण आम्हाला मदत करावी अशी भावना येथील शेतकरी देवानंद पाटील यांनी व्यक्त केली आहे. या शिवाय गुलाम शेख साहेब यांनीही शासनाने या नुकसानीचा विचार करूण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments