Latest News

6/recent/ticker-posts

सोशल एज्यू.अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे गरजवंताना मदत

सोशल एज्यू.अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे गरजवंताना मदत



काळ,वेळात बांधुन न राहता गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे हिच खरी माणुसकी


औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख


औसा .गरजवंताना मदत करण्यासाठी काळ,वेळ याची कधीच गरज नसते फक्त माणूसकीचा विचार करून समोरचा गरजवंत तथा उपेक्षितांना ओळखून व त्याने आपल्याकडून कांही अपेक्षा ठेवली किंवा आपणहुन गरजवंताच्या मदतीला धावून गेलो तर त्याच्या चेह-यावरील दिसणारा समाधान हेच कार्य जिवनात समाधान व पूण्याचा आहे.याच विचाराचा धागा धरून फक्त लाकडाऊन पूरतं सिमीत न रहाता आतापर्यंत उत्तरप्रदेश बाराबंकी येथील १२० लोकांना धान्य,कपडे व पैशाची मदत करून सोशल वेल्फेअर सोसायटी व मित्र परिवाराने या भटक्या लोकांना मोलाची साथ दिली आहे.याचीच प्रचिती आज परत एकदा पहावयास मिळाली.गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेश येथील खालीद अन्सारी यांनी संस्थेचे पदाधिकारी मजहर पटेल व इकबाल शेख यांच्याकडे फूल विक्रीच्या व्यवसायासाठी २५०००/- रूपयाची मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला होकार देत सोशल एज्यू.अँड वेल्फेअर सोसायटी,पटेल ब्रदर्स,मित्रपरिवार आणि पै.मुजीबोद्दीन पटेल यांच्या समनार्थ परिवारकडून दहा हजार असे एकूण २०१००/- रू.रोख स्वरूपात देण्यात आले.या देणगीदारा मध्ये मुजाहेद पटेल,म.मुस्लीम कबीर,फकीरपाशा शेख,रिजवान पटेल,शेख अमान,सोशल ट्रस्ट आणि पटेल ब्रदर्स यांनी भाग घेतला.यावेळी मजहर पटेल संपादक ला.रिपोर्टर,इंजि.अजहर हाश्मी,अॅड.इकबाल शेख,डॉ.जिलानी पटेल,मुज्जकीर काझी,पाशा शेख,इम्रान शेख,हुसेन पटेल,खालीद अन्सारी,अजमत पटेल तथा मित्रपरीवार व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मजहर पटेल यांनी तर आभार उत्तरप्रदेश येथील खालेद अन्सारी यांनी मानले.


Post a Comment

0 Comments