Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने श्रीमती पटेल सुलताना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने श्रीमती पटेल सुलताना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून लातूर येथे राहुल केंद्रे जिल्हा परिषद चे अध्यक्ष यांच्या हस्ते महाराष्ट् राज्य आदर्श शिक्षक समितीचा पुरस्कार श्रीमती पटेल सुलताना यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर येथिल जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात दि.७ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरण संपन्न झाला. सोशल डिस्टंस नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे प्रमुख पाहुणे सौ.भारतबाई सोळुंके (उपाध्यक्षा जिल्हा परिषद लातूर), गोविंदराव चिलकूरे,(सभापती कृषी),रोहीदास वाघमारे ( समाज कल्याण सभापती), माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे,आदी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. लाँकडाऊनच्या कळात विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्वक उपक्रम राबवून घेणे,अध्यापनात नविन कौशल्याचा वापरणे अशा वैशिष्ट्ये पूर्ण कार्याबद्दल गौरव करण्यात आले आहे. वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,केंद्र प्रमुख सलिम शेख,शाळेचे मुख्याध्यापक पांडूरंग दहिफळे सहशिक्षीका डांगे मॕडम,बिरादार मॕडम,झुंजरवार सर आदिनी अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments