जनावरांच्या गोठ्यासाठी प्रस्ताव मागवून निधि उपलब्ध करून द्यावा
औशात मनसेने दिले तहसीलदारांना निवेदन
औसा:{तालुका प्रतिनिधी/बी.जी.शेख} महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना जनावरासाठी गोठा बांधकाम करण्यासाठीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत त्वरित मागवून घ्यावेत व गरजू शेतकरी तथा पशुपालकाना सदरील योजनेतून गोठा बांधकामास निधी प्राप्त करून द्यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसा च्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आज दि.१५ सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
0 Comments