Latest News

6/recent/ticker-posts

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अप्पर मुख्यसचिव,उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना शिफारस

लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अप्पर मुख्यसचिव,उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना शिफारस



लातुर:(प्रतिनिधी) लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने डॉ धनराज माने,शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मा अप्पर मुख्यसचिव, उच्च तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांना शिफारस केली आहे


आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या मागणीच्या अनुषंगाने लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्या बाबत संचालनालयाचे पत्रांनव्ये सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड व कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे कडून अहवाल मागविण्यात आला होता. सदरचा अंतिम अहवाल सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड यांचे कडून संदर्भ क्र.१२ चे पत्रांनव्ये प्राप्त झालेला असून, त्यानुसार लातुर जिल्हयाअंतर्गत तालूका निहाय अनुदानित ३६ महाविद्यालय,कायम विनाअनुदानित ८० आहे व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१०आहे


कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे अहवालावरून लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्या बाबत विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत कलम३(२)नुसार शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे असून 


लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यास सहसंचालक, उच्च शिक्षण, नांदेड यांनी शिफारस केलेली आहे  


कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी सादर केलेली वस्तुस्थिती शासनास पुढील कार्यवाही सत्व पाठविण्यात आले आहे(दि.१५ सप्टेंबर २०२० चे पत्र सोबत जोडले आहे) मा डॉ धनराज माने, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे


आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने


 मुख्यसंयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे,धनराज जोशी, प्रा एकनाथ पाटील, बालाजी पिंपळे,अड गोपाळ बुरबुरे,ताहेरभाई सौदागर,प्रा संगमेश्वर पांनगावे,अड अजय कलशेट्टी,प्रा भीमराव डुनगावे,रणधीर सुरवसे, जावेद मणियार, प्रा गिरीधर तेलंगे,प्रा दत्तात्रय खरटमोल, सुनील खडबडे,प्रा योगेश शर्मा, अड अजित चिखलीकर, साईनाथ घोणे, सातलींग गौड, प्रविण नाबदे,दिगंबर कांबळे,मुन्ना तळेकर,योगेश शिंदे,अनतेश्वर कुदरपाके,डॉ अंबादास कारेपूरकर, यशपाल कांबळे,डॉ विनोद घार,चैतन्य फिस्के,जमालोद्दीन मणियार,महेश विजापुरे,फिरोज तांबोळी आदींनी आभार व्यक्त केले आहे. 


Post a Comment

0 Comments